Gunaratna Sadavarte News : ST आंदोलन 'हायजॅक', मराठा आरक्षणाला कडाडून विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते कोण...?

Maratha Reservation News : नगरसेवकाचा मुलगा ते विद्यार्थी नेता
Gunratna Sadavarte News
Gunratna Sadavarte NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर गुरुवारी सकाळी काही जणांनी हल्ला केला. त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.जाणून घेऊ यात त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी...

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) हे मूळचे नांदेड शहरातील आहेत. नांदेड येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात गुणरत्न यांचा जन्म झाला. नांदेड शहरातील प्रभातनगर येथे त्यांचे घर असून, येथेच त्यांचे बालपण गेले. गुणरत्न सदावर्ते यांचे वडील निवृत्ती ऊकाजी सदावर्ते हे नांदेड महानगरपालिकेचे नगरसेवक होते. भारिप बहुजन महासंघाकडून ते निवडून आले होते.

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gunratna Sadavarte News
Modi in Shirdi : महाराष्ट्रात आले आहात, तर जरांगे पाटलांची भेट घ्या; उद्धव ठाकरे PM मोदींना थेट बोलले

त्यासोबतच हा प्रभाग महिला राखीव पडल्यानंतर गुणरत्न सदावर्तेची आजी व निवृत्तीची आई यादेखील एक वेळेस नांदेड महानगरपालिकेच्या अपक्ष नगरसेविका होत्या. विशेष म्हणजे वडील निवृत्ती ऊकाजी सदावर्ते हे पोलिस कर्मचारी होते.

नांदेड येथील नेहरू इंग्लिश स्कूल या शाळेत त्यांचे दहावीपर्यंतचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झाले. त्यांनी सुरुवातीला बीडीएसमध्ये शिक्षण घेऊन दंत रोग तज्ज्ञ म्हणून काम केले.

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी नांदेड येथील गुरू गोविंद सिंग वैद्यकीय रुग्णालयात १९९९ मध्ये एक वर्ष डॉक्टर म्हणून नोकरी केली. त्यानंतर वकिली व्यवसाय सुरू केला. शिक्षण घेत असताना ते विविध चळवळीत आधीपासूनच सक्रिय होते. नांदेडला ते 'सम्यक विद्यार्थी आंदोलन' ही त्यांची संघटना चालवायचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळत होते.

महत्त्वाच्या आणि वादग्रस्त प्रकरणात वकिली

वकिली व्यवसाय सुरू केल्यानंतर नांदेड(Nanded) हून येऊन मुंबईत ते स्थायिक झाले. तेथेच ते वकिली करू लागले. त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएच. डी. केली आहे. त्याशिवाय 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील या मुंबई हायकोर्टात वकील आहेत.

Gunratna Sadavarte News
Karad Maratha Morcha News : पोतलेत पुढाऱ्यांना गावबंदी; दोनशे जणांच्या रक्ताच्या ठशाचे निवेदन मोदींना पाठवणार

सदावर्तेंनी २००२ पासून मुंबई हायकोर्टात वकिली करण्यास सुरुवात केली. मराठा आरक्षण, सेंट जॉर्ज विद्यार्थी आंदोलन, अनिल देशमुख मनिलॉंड्रिंग, एसटी महामंडळ कर्मचारी विलीनीकरण, के. इ. एम, जे जे हॉस्पिटल कर्मचारी आंदोलन अशी विविध नामांकित आणि विवादित प्रकरणी त्यांनी वकिली केली.

या मुद्द्यावरून आले होते चर्चेत...

राज्य सरकारने २०१८ मध्ये मराठा समाजाला 'सामाजिक आणि शैक्षणिक मागास ' या प्रवर्गाअंतर्गत आरक्षण दिले होते. मात्र, हे आरक्षण असंवैधानिक असल्याने ते देऊ नये, अशी भूमिका सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली. ५ मे २०२१ रोजी, मराठा समाजाला या प्रवगाअंतर्गत दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने रद्दपातल ठरवले. त्यामुळे सदावर्ते चर्चेत आले आहेत.(Maratha Reservation)

(Edited By Deepak Kulkarni)

Gunratna Sadavarte News
Sharad Pawar News : शरद पवारांच्या मनात चाललंय तरी काय ? महिन्यातच पुन्हा जुन्नरमध्ये, उमेदवाराची चाचपणी ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com