Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama

Sharad Pawar News : शरद पवारांच्या मनात चाललंय तरी काय ? महिन्यातच पुन्हा जुन्नरमध्ये, उमेदवाराची चाचपणी ?

NCP Political News : पक्षाचे आमदार अतुल बेनके हे तटस्थ असले, तरी त्यांचा कल अधिक अजितदादांकडे असल्याने लपून राहिलेले नाही...
Published on

Pimpri Chinchwad News : आदिवासी चौथरा तथा काळा चबुतरा अभिवादन दिनानिमित्त बिरसा ब्रिगेडने आय़ोजित केलेल्या राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषदेला या महिन्यात एक तारखेला शरद पवार हे जु्न्नरला आले होते. त्यावेळी त्यांनी राजकीय भेटीगाठी घेत चर्चा केली होती.

त्यानंतर महिन्यातच ते पुन्हा येत्या दोन तारखेला जुन्नर तालुक्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात जुन्नरचा उमेदवार देण्याविषयी चाचपणी, तर सुरू नाही ना, अशी चर्चा जुन्नरच नाही, तर उत्तर पुणे जिल्ह्यात ऐकायला मिळाली.

Sharad Pawar
Pune Lok Sabha : धंगेकर, जोशी, शिंदेंनंतर आता माजी मंत्र्याने पुणे लोकसभेवर ठोकला दावा!

राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर पक्षाचे बहुतांश आमदार अजित पवारांबरोबर (Ajit Pawar) गेल्याने शरद पवारांनी त्यासाठी दुसरी फळी म्हणजे यंग ब्रिगेड बांधणीवर भर दिला आहे. त्यासाठी त्यांच्या पक्षाचे युवा आमदार रोहित पवारांनी अधिक पुढाकार घेतला आहे. ते नव्या दमाच्या तरुणांना पदे देऊन संधी देत आहेत. परिणामी या पक्षाकडे तरुणांचा ओढा वाढला आहे. या नितीचा एक भाग म्हणून जुन्नरमध्येही येत्या विधानसभेला नवा चेहरा देण्याची चाचपणी त्यांनी सुरू केल्याची चर्चा आहे.  (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंबेगाव नाही, तर तूर्त जुन्नर रडारवर

राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवारांची साथ त्यांचे अत्यंत विश्वासू तथा राइट हॅंड समजले जाणारे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे-पाटील(Dilip Walse Patil) यांनी सोडली. ते अजित पवारांना जाऊन मिळाले. तेव्हाच पहिली सभा आंबेगावात घेण्याचे पवारांनी ठरवले होते, पण ती या ना त्या कारणाने झाली नाही. म्हणून त्यांनी मग, जुन्नर आपल्या निशाण्यावर घेतले.

तेथील पक्षाचे आमदार अतुल बेनके हे तटस्थ असले, तरी त्यांचा कल अधिक अजितदादांकडे असल्याने त्यांना पर्याय शोधण्य़ास सुरुवात झाल्याची जुन्नरमध्येच चर्चा आहे. म्हणून पवार मागील दौऱ्यात बेनकेंकडे न जाता ते विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कॉंग्रेसचे सत्यशील शेरकर यांच्याकडे गेले व जेवले. त्यावेळी त्यांच्यात चर्चाही झाल्याचे कळले. तेव्हाच जुन्नरच्या मैदानात सत्यशील हा नव्या दमाचा तरुण चेहरा उतरण्याची चर्चा रंगली होती.

वळसे येणार का, की परत हुलकावणी देणार?

दरम्यान, येत्या दोन तारखेला शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा खास विघ्नहर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी येत आहेत. या वेळी मागे राहिलेली अपुरी चर्चा ते पुढे नेण्याची वा पूर्ण करण्याची शक्यता आहे. दरम्यान, चर्चेला आणखी बळ मिळू नये म्हणून सत्यशील यांनी कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात विश्वजीत कदम यांनाही बोलावले आहे.

Sharad Pawar
Marathwada Political News : बिअरचा खप वाढवू पाहणाऱ्या सरकारला बुद्धी दे; राजुरेश्वराला अभिषेक घालत तरुणाची बॅनरबाजी...

राज्याचे सहकारमंत्री म्हणून दिलीप वळसे-पाटील यांनाही यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, पण एक तारखेच्या जुन्नर येथील आदिवासी मेळाव्याला बोलावूनही ते त्यावेळी आले नव्हते. यामुळे ते आता, तरी शरद पवारांसमोर येतील की नाही, याविषयी शंका आहे. मात्र, सत्यशील यांनी ते नक्की येणार असल्याचा दावा केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Sharad Pawar
Gram Panchayat election : नारायण पाटलांच्या चिरंजीवाचे वडिलांच्या पावलावर पाऊल; सरपंचपदाच्या निवडणुकीपासून राजकीय श्रीगणेशा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com