आर्यनची सुटका आज होणार का? सतिश मानेशिंदेंनी दिलं उत्तर

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, आज त्याची कारागृहातून सुटका होणार आहे.
Shahrukh Khan with Satish Maneshinde and his team
Shahrukh Khan with Satish Maneshinde and his teamFile Photo

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs case) प्रकरणी आर्यन खानसह (Aryan Khan) मुनमुन धमेचा (Mummun Dhamecha) आणि अरबाझ मर्चंट (Arbaaz Merchant) या तिघांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आर्यनची आज आर्थर रोड कारागृहातून सुटका होणार का याविषयी आर्यनचे वकील सतिश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी माहिती दिली आहे.

सतिश मानेशिंदे म्हणाले की, उच्च न्यायालयाकडून आज सायंकाळी जामिनाचा आदेश आम्हाला अपेक्षित आहे. आम्हाला हा आदेश मिळाल्यानंतर तो विशेष एनडीपीएस न्यायालयात सादर केला जाईल. विशेष न्यायालयात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आर्यनच्या सुटकेचा आदेश आमच्या हाती पडेल. आर्यनची आजच सुटका होणे आम्हाला अपेक्षित आहे.

या प्रकरणातील मुनमुन धमेचा हिचे वकील काशिफ खान देशमुख म्हणाले की, उच्च न्यायालयाकडून 3 वाजल्यानंतर जामिनाचजा आदेश मिळण्याची आशा आहे. जास्तीतजास्त यासाठी 4.30 वाजेपर्यंत तो मिळेल. यानंतर आम्हाला सर्व कागदपत्रांची पूर्तता करून कारागृह प्रशासनाकडे जाण्यासाटी पुरेसा वेळ असेल. त्यामुळे आजच त्यांची सुटका होईल.

Shahrukh Khan with Satish Maneshinde and his team
तीन आठवड्यानंतर जामीन मिळाला अन् आर्थर रोड कारागृहातील आर्यन म्हणाला...

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (NCB) आर्यनला 3 ऑक्टोबरला पकडले होते. तो 8 ऑक्टोबरपासून आर्थर रोड कारागृहात आहे. आर्यनसह तिघांच्या जामिनावर तीन दिवस उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आर्यनच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. रोहतगी हे आर्यनची बाजू मांडणार असल्याचे सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर तीन दिवसांच्या सुनावणीनंतर आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे.

Shahrukh Khan with Satish Maneshinde and his team
रेल्वे मंत्रालयावर 19 तासांत निर्णय मागे घेण्याची नामुष्की पण झाला मोठा फायदा

उच्च न्यायालयात सलग तीन दिवस आर्यनसह तिघांच्या जामिनावर सुनावणी सुरू होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी आर्यन, मुनमुन आणि अरबाझ या तिघांना 28 ऑक्टोबरला जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाचा जामिनाचा आदेश मिळाल्यानंतर तिघांची कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आर्यन आणि अरबाझ हे आर्थर रोड कारागृहात तर मुनमुन भायखळा महिला कारागृहात आहे. जामिनाचा आदेश आज न्यायालयाकडून मिळणार असून, त्यानंतर त्यांची सुटका होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com