Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेंची लायकीच काढली; म्हणाले, 'ज्याच्या रक्तात गद्दारी...'

Dhananjay Munde : अजित पवार वेगळे झाल्यानंतर आव्हाडांना शरद पवार गटात मोठे व्हायचे आहे.
Jitendra Awhad, Dhananjay Munde
Jitendra Awhad, Dhananjay MundeSarkarnama

Maharashtra Political News : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांवर टीका केल्यानंतर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले. त्यांनी अजित पवारांना सडेतोड उत्तरे देत हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न केला. यावर कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी आव्हाड पवार कुटुंबात अंतर निर्माण करत असल्याचा आरोप केला. यावर शरद पवारांनी आव्हाडांची पाठराखण केली. यानंतर आव्हाडांनीही मुंडेंचा समाचार घेतला आहे. ज्याच्या रक्तात गद्दारी त्याला निष्ठा काय समजणार, असा टोला लगावत आव्हाडांनी मुंडेंची लायकी काढली.

धनजंय मुंडे काय म्हणाले?

आव्हाड हे शरद पवार (Sharad Pawar) गटात स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी अशी वेगवेगळी विधाने करत आहेत. त्यांनी पवार कुटुंबियांमध्ये अंतर निर्माण करण्याचे काम केले आहे. ते वरून भावनिक असल्याचे दाखवतात. अजित पवार वेगळे झाल्यानंतर त्यांना शरद पवार गटात मोठे व्हायचे आहे. तेथे जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे नसाव्यात, आपणच एकटे नेते व्हावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे नेते, कृषीमंत्री धनंजय मुडेंनी केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jitendra Awhad, Dhananjay Munde
Ashok Chavan-Nana Patole : अशोक चव्हाणांच्या जाण्याने नानांना वेदना? छेडली दर्दभरी गझल...

पवारांनी केली पाठराखण

मुंडे यांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवारांनी आव्हाडांची पाठराखण केली. ते म्हणाले, मुंडे म्हणाले तसे अजिबात नाही. मुंडेंनी राष्ट्रवादीत (NCP) काम केले, त्यापेक्षा कितीतरी अधिक वर्षे आव्हाड पक्षात कार्यरत आहेत. त्यांनी देशपातळीवर संघटनेसाठी काम केले. देशातील तरुणांचं नेतृत्व केले. महाराष्ट्राच्या विधीमंडळात, राज्याच्या मंत्रिमंडळातही काम केले. त्यामुळे आव्हाडांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) काय बोलावे, याबाबत बाहेरच्या लोकांनी सांगण्याची गरज नाही, असा टोलाही पवारांनी मुंडेंना लगावला आहे.

आव्हाडांनी डिवचलं

मुंडेंच्या आव्हाडांवरील टीकेला थेट पवारांनी उत्तर दिले. शरद पवारांचा तो व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. त्या व्हिडिओला धनंजय मुंडेंना उद्देशून एक पोस्ट केली आहे. त्यात मुंडेंवर (Dhananjay Munde) आव्हाडांनी जहरी टीका केली. 'लायकी समजली का? गद्दारी रक्तात असलेल्यांना निष्ठा काय समजणार' असे कॅप्शनच आव्हाडांनी व्हिडिओला दिले आहे. त्यामुळे अजित पवार गट आणि आव्हाड यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Jitendra Awhad, Dhananjay Munde
Rahul Gandhi : राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना का घेतले अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रॉयचे नाव ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com