Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे महायुती व महाविकास आघडीच्या नेतेमंडळींची धावपळ सुरु आहे. चार नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याने मनधरणी करण्यासाठी एकीकडे नेतेमंडळी जीवाचे रान करीत आहेत.
महायुतीमध्ये अनेक विधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. या बंडखोरीचा फटका हा निवडणुकीला मोठ्या प्रमाणात बसू शकतो. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीनिवास वनगा यांच्यानंतर आता पक्षाचा आणखी एक नेता नॉट रिचेबल झाला आहे. यामुळे विधानसभेपूर्वी शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. (Shivsena News)
पालघर जिल्ह्यात शिवसेना शिंदे (Shivsena) गटाच्या वाट्याला आलेल्या दोन जागांवर शिवसेना शिंदे गटाने दोन्ही ठिकाणी भाजपमधून (Bjp) आयात केलेल्या उमेदवारांना संधी दिली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून तयारी करीत असलेल्या शिवसेनेतील उमेदवारांना संधी मिळाली नाही. ऐनवेळी भाजपमधून आलेल्या या नेत्यांना दोन्ही जागी उमेदवारी देण्यात आली त्यामुळे पालघरमधील स्थानिक शिवसैनिकांत नाराजी आहे.
चार दिवसापूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल होते. आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पालघर जिल्ह्यातील पक्षाचा आणखी एक नेता नॉट रिचेबल आहे. शिवसेना शिंदे गटाचे आदिवासी राज्य संघटक आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष जगदीश धोडी गेल्या तीन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे शिंदे गटासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
बोईसर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांच्याविरोधात जगदीश धोडी यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सध्या राज्यात बंड क्षमवण्यासाठी महायुतीकडून बंडखोरांना फोनद्वारे संपर्क केला जात आहे. मात्र याचवेळी बंडखोर जगदीश धोडी तीन दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.
शिवसेना नेते आता जगदीश धोडी हे नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे आता त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कशी मनधरणी करावयाची असा प्रश्न नेत्यांसमोर पडला आहे. भाजपमधील आयात उमेदवारांना संधी मिळत असल्याने इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात मोठी खदखद आहे. त्यामुळे या ठिकाणचे बंड कसे मोडीत काढायचे असा प्रश्न नेतेमंडळीसमोर पडला आहे.
पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांकडून गेल्या काही दिवसापासून बंडखोरी करणाऱ्या मंडळींशी बोलणी सुरू आहे. मात्र, शेवटच्या दिवसापर्यंत सर्व बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील, का नाही असा प्रश्न सर्वच नेतेमंडळींना सतावत आहे. मात्र तरीही बंडखोरांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यास त्याचा मोठा फटका हा महायुतीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेवटच्या दोन दिवसात काय प्रयत्न केले जाणार यावर सर्व काही अवलंबुन आहे,
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.