Maharashtra Politics : विखेंचे अधिकारी डॉक्टर होणार; सावंतांच्या खात्याचं 'ऑपरेशन' करणार!

Radhakrishna Vikhe Patil - Tanaji Sawant : नांदेडमधील घटनेनंतर आता सरकार सतर्क झाले आहे.
Radhakrishna Vikhe Patil - Tanaji Sawant
Radhakrishna Vikhe Patil - Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

Beed News : नांदेडमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांच्या मृत्युचक्रानंतर राज्यभरातील इतरही काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व जिल्हा रुग्णालयांतील मृत्युचक्र समोर आले. यामुळे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाची लक्तरे वेशीला टांगली गेली. तज्ज्ञांची व परिचारिकांची रिक्त पदे,नअपुरा औषधसाठा अशा विविध कारणांनी आरोग्य विभागच ‘आयसीयू’त असल्याचे समोर आले. त्याचे 'ऑपरेशन' आता महसूल विभाग करणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील महसूल अधिकारी वैद्यकीय महाविद्यालये व जिल्हा रुग्णालये, तसेच अधिनस्थ रुग्णालयांना भेटी देऊन तेथील उपलब्ध औषधीसाठा, रिक्त पदांचा आढावा, उपचाराची माहिती घेऊन याचा अहवाल शासनाला पाठवणार आहेत. (Nanded Incident)

Radhakrishna Vikhe Patil - Tanaji Sawant
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्क! आता एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा कुठे होणार ?

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मतदारसंघातील कळवा येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांचे मृत्युचक्र समोर आले. या अपयशाकडे सरकारने थेट काणाडोळा केला, पण नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मृतांच्या आकड्याने राज्याचे राजकारणच ढवळून निघाले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणच्या शासकीय आरोग्य संस्थांमधील मृत्यूंचे मोठ मोठे आकडे समोर आले.

नांदेडमधील घटनेनंतर आता सरकार सतर्क झाले आहे. औषधी, तज्ज्ञांसह इतर मनुष्यबळ व उपचार याबाबत महसूल व झेडपीच्या अधिकाऱ्यांना निगरानी ठेवण्याचे निर्देश खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात कोणता अधिकारी कोणत्या दवाखान्यांची पाहणी करणार, असे आदेश काढले आहेत.

महसूलचे अधिकारी त्या जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांना भेटी देऊन पाहणी करतील, तर जिल्हा परिषदेचे अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची पाहणी करतील.

यंत्रणेतील दोष, औषधी साठा, मनुष्यबळ, स्वच्छता आदींबाबत अहवाल तयार करून शासनाला देतील. मात्र, अहवालांचे ढिगारेच वाढणार का, तज्ज्ञांची रिक्त पदे भरून आवश्यक औषधीसाठा शासन देणार याकडे लक्ष लागले आहे.(State Government)

(Edited By Deepak Kulkarni)

Radhakrishna Vikhe Patil - Tanaji Sawant
Tejaswini Pandit Blue Tick : टोलवरून फडणवीसांना प्रश्न विचारणाऱ्या तेजस्विनी पंडित यांचे 'ब्लू टिक' गायब!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com