Mahayuti Meeting : आम्ही घड्याळाच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार;तटकरेंनी महायुतीच्या बैठकीतून रणशिंग फुंकले

Sunil Tatkare News : आम्ही तुमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुमची थोडीफार अडचण झाली असेल.
Sunil Tatkare
Sunil Tatkaresarkarnama

Mumbai News : आगामी निवडणुका आम्ही घड्याळाच्या चिन्हावरच लढविणार आहोत, हे मी पुन्हा एकदा मुद्दामहून सांगतो. आपल्या तिघांना जिल्हा, तालुका स्तरावर काम करावं लागेल, कार्यकर्त्यांचं मनोमिलन घडवावं लागेल. एकमेकांची मते ट्रान्सफर करावी लागतील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. (We will contest the elections on the clock: Sunil Tatkare)

मुंबईत आज शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या बैठकीत बोलताना तटकरे यांनी निवडणुकीच्या आयोगाच्या निर्णयासंदर्भात भाष्य केल्याचे मानले जात आहे. तटकरे म्हणाले की, एक नवा विचार घेऊन देशभरात काम करण्याचे निर्णय अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही घेतला आहे. आम्ही पहिल्यांदा जरी तुमच्या व्यासपीठावर उपस्थित असालो तरी आमच्या मनात अडचण नाही आणि संभ्रम असण्याचे काही कारण नाही.

एकत्रित येण्याचा निर्णय झाल्यावर विचारांची तफावत आणि वैचारिक मतभेद असू शकत नाही. आपल्या सर्वाना एकत्र जमण्यास काहीसा उशीर झाला आहे. आपले उद्दिष्ट ४८-० आहे. ते गाठण्यासाठी यापुढे असंच एकत्र येत राहावं लागणार आहे, असेही सुनील तटकरे यांनी नमूद केले.

Sunil Tatkare
Solapur Politics : भाजप खासदाराच्या बनावट जातप्रमाणपत्राची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याची मंत्रालयात बदली

ते म्हणाले की, चांद्रयानाच्या यशाचे कौतुक विरोधकांनी करायला पाहिजे होते. मात्र, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी नेहरूंचे कौतुक केलं. त्यांच्या धोरणाचा भाग असला तरी त्याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. पण त्यानंतरच्या प्रत्येक पंतप्रधानांनी तसेच निर्णय घेतले. बांगलादेशची निर्मिती केल्यानंतर विरोधी पक्षात असणारे अटलबिहारी वाजपेयीयांनी इंदिारा गांधी यांचे कौतुक केलं होतं राजीव गांधी यांच्या नेतृत्वाने देशभरात संगणकाचे युग आणले. त्यावेळी असं कोणी म्हटलं नाही. पण आज मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आंतराष्ट्रीय गौरवाची एक बाब झाल्यानंतर कौतुकाची भूमिका काँग्रेसकडून घेतली पाहिजे होती.

Sunil Tatkare
Rohit Pawar On NCP Crisis : राष्ट्रवादीत वाढतेय रोहित पवारांची 'पॉवर'; विरोधी नेत्यांसोबत भेटीगाठी, सुळेंनी केले 'राष्ट्रीय प्रमोशन' ?

आपण दीर्घकाळ एकमेकांविरोधात लढत आहोत. आम्ही रामदास कदम यांच्याशी दीर्घ काळापासून लढत आहोत. पण तो आता इतिहास आहे. काल काय घडलं त्यापेक्षा उद्याच्या उषाकालमध्ये काय लपलेलं आहे, ते घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे. आम्ही तुमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुमची थोडीफार अडचण झाली असेल. पण, व्यापक हित ठेवून काम करणार असू तर कुणाच्या कुणाच्या पदरात काय पडले, यापेक्षा राज्याचा हितासाठी आपण काय करतो आहोत, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

Sunil Tatkare
INDIA Meeting In Mumbai : इंडिया आघाडीत मोठी घडामोड; काँग्रेस नेते नाराज, ‘जी-२३’मधील ‘या’ नेत्याची उपस्थिती ठरली कारणीभूत

आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांसमोर आव्हान आहे. ते आव्हान पेलण्याची ताकद महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनगटात निश्चितपण आहे. आपल्या सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोचविण्याची ताकद आपल्या कार्यकर्त्यांच्या मनगटात आहे. टीका टिपण्णीपेक्षा एक विचारधारेवर आपण काम करण्याचा निर्णय आपण घेतला आहे, तर आपल्याला चांगलं यश मिळेल, अशा आशावादही तटकरे यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, केवळ लोकसभा नाही तर आगामी विधानसभासुद्धा आपण एकत्र लढून जास्त जागा जिंकण्याचा संकल्प करू. आज आपले २१५ आमदार असतील पण आगामी निवडणुकीत २२५ आमदार निवडणून आणण्यासाठी आपण सर्वजण काम करू. त्याग करण्यामध्येही कोणाच्या मनात संदेह राहणार नाही.

Sunil Tatkare
Ajit Pawar ED News: राज्य बॅंकेच्या आरोपपत्रातून अजित पवारांचे नाव वगळलं; पण शिंदे गटाचा एक नेता अडकला

आपल्या तिघांना जिल्हा, तालुका स्तरावर काम करावं लागेल. कार्यकर्त्यांचं मनोमिलन घडवावं लागेल. एवढी वर्षे परस्पर विरोधी लढल्यानंतर मतदारांच्या मनातही साशंकता राहणार नाही, याची काळजी आपल्याला घ्याची लागले. भाजपचे उमेदवार कमळ चिन्हावर असतील, त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या लोकांना भाजपला मतदान करावं लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खासदार तटकरे म्हणाले की, महायुतीचे निर्णय समाजहिताचे, शेतकरी हिताचे निर्णय असतील. एक रुपयांत पीकविमा देण्याचे काम फक्त महाराष्ट्र सरकारने केले आहे. उद्याचे भविष्य चांगले घडविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. त्रिमूर्तीच्या माध्यमातून घेतलेले निर्णय महाराष्ट्र आणि मुंबईच्या हिताचे असतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com