Mumbai News : राज्याच्या सत्तासंघर्षात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे ट्विट केले आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडली. अजित पवार मुख्यमंत्री होणार तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काय होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळातच नव्हे तर अगदी सर्वसामान्य नागरिकांमध्येही होऊ लागल्या. अशातच आता मिटकरींपाठोपाठ अजित पवार यांच्या गटाच्या आणखी एका बड्या नेत्याने अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला आहे.
अमोल मिटकरींच्या दाव्याला दुजोरा देत आमदार अनिल पाटील यांनीही अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा दावा केला आहे. याचवेळी १४५ च्या आकड्याचाही त्यांनी उल्लेख केला. “हे अमोल मिटकरी एकटेच हे म्हणत नसून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. पण त्याबरोबर १४५ आमदारांचा आकडा गाठणे आवश्यक असते. हा आकडा गाठला तर, तर १०० टक्के अजित पवार हेच राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होतील. पण सध्या तो आकडा आमच्याकडे नाही.असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
अमोल मिटकरींच्या या ट्वीटवर बोलताना नवनिर्वाचित मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “फक्त पोस्टर्स लावून कोणीही मुख्यमंत्री होत नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी १४५ आमदार लागतात आणि हे स्वत: अजित पवार यांनी अनेकदा सांगितली आहे," त्यानंतर याच मुद्द्यावरून अनिल पाटील यांनीही आपली भूमिका मांडली आहे
दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी अजित पवार यांचा वाढदिवानिमित्त अमोल मिटकरींनी ट्विट करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या ट्विटमध्ये त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख अजित पर्व असा केला आहे. मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व, असे ट्विट केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
तर एकनाथ शिंदे हेच 2024 नंतरही मुख्यमंत्री असतील असे शिंदे गटाचे नेते सांगत असले तरी मिटकरींच्या ट्विटने नव्या वादाला फोडणी दिली आहे. मिटकरींनी हे ट्विट करून शिंदे गटाची झोप उडवली आहे. त्यामुळे शिंदे गटाची एकप्रकारे झोपच उडाली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.