Minority Schools : अजितदादांच्या निधनादिवशी घेतलेल्या वादग्रस्त निर्णयाला CM फडणवीसांची स्थगिती; 75 शाळांच्या अल्पसंख्याक दर्जाची अन् अधिकाऱ्यांची होणार झाडाझडती

Maharashtra minority status controversy : अजितदादांच्या निधनाच्या दिवशी आणि त्यानंतर काही तासांमध्ये मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या शाळांना प्रमाणपत्र वाटल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 16 Feb : संपूर्ण राज्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे दु:खात असतानाच मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी जवळपास 20 संस्थांच्या 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याचा धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

अजितदादांच्या निधनाच्या दिवशी आणि त्यानंतर काही तासांमध्ये मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या शाळांना प्रमाणपत्र वाटल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे अजितदादांच्या निधनामुले राज्यभरात दुखवटा जाहीर केला असतानाच या अधिकाऱ्यांनी हा कारनामा केला आहे.

दरम्यान, हा सगळा प्रकार समोर येताच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. फडणवीसांनी या 75 शाळांना दिलेला अल्पसंख्याक दर्जा स्थगित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Devendra Fadnavis
Brick kiln worker son success story : 30 वर्षे वीटभट्टीवर काम… आईवडिलांच्या कष्टांच्या विटांवर उभं राहिलं स्वप्न! ज्ञानेश्वराने स्पर्धा परीक्षेत कोरलं यशाचं सुवर्णपान

फडणवीसांच्या आदेशानंतर या प्रमाणपत्रांना स्थगिती देण्यात आली आहे. तर आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आणि ज्या अधिकाऱ्यांनी घाईगडबडीत शाळांना अल्पसंख्याक दर्जा दिला त्या सर्व दोषींवर कारवाई करण्याचे आदेशही फडणवीसांनी दिले आहेत.

Devendra Fadnavis
Ajit Pawar Death: अजितदादा, कोकोटेंनी दिलेली स्थगिती कोणी उठवली? नामांकित शाळा कशा झाल्या अल्पसंख्याक....

नेमकं काय घडलं?

अजित पवारांच्या निधनाच्या त्याचदिवशी मंत्रालयात 3 वाजून 9 मिनिटांनी पहिले प्रमाणपत्र जारी करण्यात आले. ज्या 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा दिला त्यात 25 पोदार इंटरनॅशनलच्या शाळांचा समावेश आहे. तर अजितदादांच्या निधनादिवशीच 6 शाळांना प्रमाणपत्र देण्यात आली.

राज्यात दुखवटा असताना आणि संबधित खात्याच्या मंत्र्याचे निधन झाले असताना अधिकाऱ्यांनी या शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिला. त्यामुळे राज्यभरातून या कृतीवर संताप व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com