Devendra Fadnavis On Ajit Pawar : अजितदादा आमच्यासोबत 'एकदम कम्फर्टेबल'; फडणवीसांचा दावा!

Devendra Fadnavis On Ajit Pawar : "दिवसभरात अजितदादा काय करत असतात, ते मला माहित नाही..."
Devendra Fadnavis On Ajit Pawar
Devendra Fadnavis On Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून उपमुख्यमंत्री अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारसोबत राजकीय संधान बांधलं. सरकारमध्ये सामील होऊन अजितदादांनी मंत्रिपदेही पदरात पाडून घेतली. मात्र, तरीही अजित पवार शिंदे -फडणवीस सराकरमध्ये पूर्ण समाधानी नसल्याच्या चर्चा अधून-मधून सुरू होतात. कधी मंत्रीमंडळाच्या विस्तारावरून, कधी पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून तर कधी महामंडळ वाटपाच्या मुद्द्यावरून सराकरमध्ये कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चाही होतात. अजितदादाभोवती फिरणाऱ्या या चर्चांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. (Latest Marathi News)

एका खसगी मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, "माध्यमांचे प्रतिनिधी नेत्यांना येता -जाता संवाद साधत असतात. काही प्रश्न विचारतात. तुमचा माईक चालू आहे की नाही, याची कल्पना नसते, त्यात आमचं काही बोलून गेलो तर तुम्ही वेगवेगळे अर्थ काढता असता. आता दिवसभरात अजितदादा काय करत असतात, ते मला माहित नाही. मी काय करतो ते दादांना माहिती नसतं. तिकडे मुख्यमंत्रीही काय करतात ते आम्हाला सांगून करत नाहीत. जिथे आम्हा तिघांना एकत्र येण्याची आवश्यकता असले तर आम्ही एकत्रित जमतो. अजितदादा आमच्यासोबत १०० टक्के कंफर्टेबल आहेत," असे स्पष्टीकरण फडणवीसांनी दिले.

मला लक्ष्य केलं जातंय -

"मला लक्ष्य केल्या जाण्याचं एकमेव कारण आहे, ते म्हणज माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मराठा आरक्षण न्यायालयात टिकवून दाखवलं. खरंतर आरक्षणाची याची लढाई १९८० पासूनच सुरू झाली होती. आण्णासाहेब पाटलांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपले प्राण दिले. तेव्हापासून आरक्षणाची लढाई सुरू झाली. माझ्या कार्यकाळात पहिल्यांदा आरक्षण मी दिलं होतं, कोर्टातही ते टिकवून दाखवंल," असा दावाही फडणवीसांनी केला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com