Jitendra Awhad News : अजितदादा सर्वांनाच भाजपमध्ये जाण्यास सांगत होते; आव्हाडांच्या आरोपांना मल्हार पाटलांचा आधार

Lok Sabha Election 2024 : लोकांना गुंडांचे फोन येतात हे शंभर टक्के खरे आहे. अमोल कोल्हे साखर कारखान्यांचा मालक नाही. तुम्हाला फक्त दोन उमेदवारी मिळाल्या आहेत. बाकी उमेदवारी कशा मिळाल्या ते साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे,
Jitendra Awhad, Ajit Pawar
Jitendra Awhad, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी केलेल्या विधानांनी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आम्हाला आधी भाजपमध्ये जाण्यास सांगितले होते. त्यानतंर ते आले. यासह आमच्या रक्तात राष्ट्रवादी, ह्रदयात भाजप असे विधान केले. पाटलांच्या या वक्तव्यांना शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी दुजोरा दिला आहे. 2014 पासून ते आम्हाला भाजपमध्ये जा असे म्हणत असल्याचाही गौप्यस्फोट आव्हाडांनी केला. Sharad Pawar fraction leader Jitendra Awhad Attack on Ajit Pawar.

जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad म्हणाले, मल्हार पाटील यांनी खरे सांगितले. अजितदादांनी आम्हाला भाजपमध्ये जा, असे सांगितले. त्यावर मी वारंवार सांगत होतो, की ते पक्ष फोडण्याचे काम करत आहेत. याची सुरुवात 2014 पासून झालेली होती. शरद पवार यांचे घर कुरतडण्याचे काम कोण करत होते, हे मला माहिती आहे, असा घणाघात आव्हाडांनी अजित पवारांवर केला आहे.

बारामतीत दहशतीचे वातावरण असल्याचे रोहित पवार Rohit Pawar बोलले आहेत. लोकांना गुंडांचे फोन येतात हे शंभर टक्के खरे आहे. ते गुंड कोण आहेत, कोणत्या गँगचे आहेत, त्यांच्यावर किती मर्डर केसेस आहेत, किती गुन्हे आहेत याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. दहशत निर्माण व्हावी यासाठी गँगचा वापर केला जात आहे. रोहित पवार जे बोलले त्यात एक शब्दही खोटा नाही, असा दावाही आव्हाडांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jitendra Awhad, Ajit Pawar
Prithviraj Chavan : पवारांकडून पृथ्वीराज चव्हाणांना दोनदा हुलकावणी; सातारा लोकसभा जागेबाबत काय घडलं?

अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हेंवर Amol Kolhe केलेल्या टीकेचाही आव्हाडांनी समाचार घेतला. त्यांना कोणाच्या कलेबद्दल त्याच्या कलेतील कर्तृत्वाबद्दल बोलण्याचा अधिकार कोणी दिला? तो त्याचा पोट भरण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे दहा साखर कारखाने, बँक, दूध संघ यातील काहीही नाही. अमोल कोल्हे शिवाजी आणि संभाजी महाराजांची छान भूमिका करून लोकांसमोर इतिहास उभा करतो. तुम्हाला कार्यसम्राट हवे असल्याने आढळरावांना उधार घ्यावे लागले. तुम्हाला फक्त दोन उमेदवारी मिळाल्या आहेत. बाकी उमेदवारी कशा मिळाल्या ते साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे, असा टोलाही आव्हाडांनी अजितदादांना लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

Jitendra Awhad, Ajit Pawar
PM Modi Interview : राम मंदिर, इलेक्टोरल बाॅण्ड, गुजरातचा विकास..! काय आहेत PM मोदींच्या मुलाखतीतले प्रमुख दावे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com