Maharashtra Political News : आमदार एकनाथ खडसेंनी सुमारे अडीच वर्षांपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची Sharad Pawar साथ देणे पसंत केले. आता मात्र त्यांनी घरवापसी करणार असल्याचे संकेत दिले आहेत. भाजपमध्ये गेल्यानंतर खडसेंची राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहित या नेमणुकीला विरोध केला आहे. Anjali Damania oppose Eknath Khadse to be Governor.
अंजली दमानिया Anjali Damania यांनी राष्ट्रपती दौपदी मूर्म यांना एकूण सहा पानाचे पत्र लिहिले आहे. त्या पत्राची प्रत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही पाठवलेली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली.
या पत्रात दमानिया यांनी एकनाथ खडसे Eknath Khadse यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची माहिती दिली आहे. नैतिक पतनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला राज्यपाल बनवता येत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. या प्रलंबित प्रकरणांमुळे खडसेंची एखाद्या राज्याच्या राज्यपालपदी नेमणुकीची शिफारस झाली तर ती नाकारावी, अशी विनंती त्यांनी वरील नेत्यांना केली. तसेच राष्ट्रपती या संविधान आणि कायद्याचे रक्षण करतील, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकनाथ खडसे राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपमध्ये प्रवेश होताच खडसेंची राज्यपाल म्हणून वर्णी लागणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर दमानिया यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची यादी देत खडसेंच्या पुनर्वसनावर आक्षेप घेत आले. तसेच घटनेच्या कलम 60 नुसार, राष्ट्रपती संविधान आणि कायद्याचे जतन, संरक्षण आणि रक्षण करण्यासाठी त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम प्रयत्न करतील. ते स्वतःला सेवेसाठी समर्पित करतील, अशी अपेक्षाही दमानिया यांनी व्यक्त केली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.