Rohit Pawar : 'आता कुबड्यांची गरज संपली, मुंबई महापालिका निवडणुकीनंतर भाजप एकनाथ शिंदेंना टार्गेट करणार, ठाण्यातही नीट राजकारण करू दिलं जाणार नाही...'

Rohit Pawar On BJP : 'भाजपला कुबड्याची गरज संपलेली असून अमित शहांनी इथे येऊन सांगितलं की, आम्हाला कुबड्यांची गरज नाही. त्यामुळे आता कुबड्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काहींची अपेक्षा होती, आदराने कुबड्यांना खोलीमध्ये टांगलं जाईल पण आता या कुबड्या तोडून चुलीत घालायचा भाजपचा प्रयत्न आहे.'
Amit Shah, Eknath Shinde. Rohit Pawar
Amit Shah, Eknath Shinde. Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune Land Scam : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवारांच्या कंपनीने जवळपास 1804 कोटी रुपयांची जमीन 300 कोटींमध्ये विकत घेतल्याच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून अजित पवारांना विरोधकांनी टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी या जमीन गैरव्यवहार प्रकरणावर बोलताना, मुंबईची निवडणूक संपली की भाजप एकनाथ शिंदेंना टार्गेट करणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणावर बोलताना रोहित पवार म्हणाले, चूक असेल तर भेदभाव न करता योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आम्ही जेव्हा काही प्रकरणं पुढे आणतो तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा व्यक्ती असेल तर त्यांच्यावर कारवाई होत नाही.

Amit Shah, Eknath Shinde. Rohit Pawar
Maharashtra Politics : 'हिंदुत्वामध्ये वाटेकरी नको, उद्धव ठाकरे लढणारा नेता नाही शिवसेना संपवून टाका; भाजप अन् संघाच्या बैठकीत रचला होता कट...' घोसाळकरांचा गौप्यस्फोट

मात्र, मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपला नेत्यांना कुणाचा गेम करायचा असेल तर त्याच्यावर लगेच कारवाई होते. आम्ही सिडको प्रकरण पुढे आणले. त्या प्रकरणातील संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही. पण पुणे जमीन घोटाळा प्रकरणात सुपरफास्ट कारवाई केली जाते, असं म्हणत त्यांनी भाजप नेत्यांवर कारवाई न करता मित्रपक्षांना टार्गेट केल्याची टीका केली.

तर भाजपला कुबड्याची गरज संपलेली असून अमित शहांनी इथे येऊन सांगितलं की, आम्हाला कुबड्यांची गरज नाही. त्यामुळे आता कुबड्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काहींची अपेक्षा होती, आदराने कुबड्यांना खोलीमध्ये टांगलं जाईल पण आता या कुबड्या तोडून चुलीत घालायचा भाजपचा प्रयत्न असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला.

Amit Shah, Eknath Shinde. Rohit Pawar
Mahayuti Politics: नगरपालिका निवडणुकीत अजित पवार, एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांनी दिला भाजपला दणका, स्वबळाची तयारी करीत भाजप वाऱ्यावर!

याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात सगळ्यात जास्त जमीन घोटाळे झाले असून जर याला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीका केली. दरम्यान, त्यांनी एकनाथ शिंदेंची भाजपला केवळ मुंबई महापालिका निवडणुकीसाठी गरज असून निवडणूक संपली की शिंदेंना टार्गेट केलं जाईल.

त्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला जाईल, ठाण्यातही नीट राजकारण करू दिलं जाणार नाही, अशी भूमिका भाजपची शंभर टक्के असणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजप आणि शिंदेंची शिवसेना काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com