Ajit Pawar: मोठी बातमी! शपथविधीनंतर काही तासांतच अजित पवारांना दिल्लीतून सर्वात मोठा दिलासा

NCP Leader Ajit Pawar Big News महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार यांना गुरुवारी विक्रमी सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवारांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : महायुती सरकारचा शानदार शपथविधी सोहळा मुंबईत गुरुवारी(ता.5) पार पडला. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्यानंतर फडणवीस कामाला लागले आहेत.पण महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या दुसर्‍याच दिवशी अजित पवारांना (Ajit Pawar) दिल्लीतून मोठा दिलासा मिळाला आहे.

इन्कम टॅक्स विभागाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते अजित पवार यांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. ती सर्व मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिल्ली ट्रिब्यूनल न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या मालमत्तांचा समावेश होता. इन्कम टॅक्स विभागाकडून मोठी कारवाई करताना अजित पवार कुटुंबियाच्या मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

Ajit Pawar
Kailas Patil Video : ठाकरेंचा पठ्ठ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भिडला, चॅलेंज देत 'त्या' दाव्यातील हवाच काढली!

अजित पवारांच्या कुटुंबियांनी इन्कम टॅक्स विभागाच्या या धडक कारवाईच्या विरोधात दिल्ली न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. आता याप्रकरणी दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या अजित पवारांच्या स्पार्कलिंग सॉईल,निबोध ट्रेडिंग, फायर पॉवर अॅग्री फार्म तसेच गुरु कमोडिटी कंपनीशी संबंधित मालमत्तांचा समावेश होता. कोर्टाच्या आदेशानंतर या सर्व मालमत्ता मुक्त करण्यात आल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

इन्कम टॅक्स विभागाकडून 2023 मध्ये संबंधित जप्तीची कारवाई करण्यात आली होती.या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. न्यायालयानेही आयकर विभागाच्या कारवाईला स्थगिती देण्यासंदर्भात आदेश दिले होते. पण मालमत्ता जप्तीसंबंधी निकाल दिला नव्हता.

Ajit Pawar
Ajit Pawar NCP : राष्ट्रवादीच्या पराभूतांना अजितदादांचे टॉनिक; ‘मी तुमच्या पाठीशी; संपूर्ण ताकदीनिशी काम करा...’

दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने अखेर अजित पवारांसह त्यांच्या कुटुंबियांची जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार यांना गुरुवारी ( ता.5) विक्रमी सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवारांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

दरम्यान आयकर विभागाने अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती रिलीज करत दिल्लीतील ट्रिब्युनलचे याबाबतचे आदेश जारी केले आहेत. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुमित्रा पवार यांची संपत्ति इनकम टॅक्स विभागाने सीज केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार आता ती संपत्ती देखील मुक्त करण्यात आली असून लवकरच अजित पवार यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केली जाणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, 7 ऑक्टोबर 2021 मध्ये अजित पवारांच्या विविध मालमत्तेवर आयकर विभागाने छापा टाकून संपत्ती जप्त केली होती. आयकर विभागाने ऑक्टोबर 2021 मध्ये छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कथितपणे संबंधित असलेली अंदाजे 1,000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. अजित पवार व त्यांच्या नातेवाईकांशीृ संबंधित मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉइंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्तांवर टाच आणून ती जप्त केली होती.

एक साखर कारखाना आणि एक रिसॉर्टही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, याबाबत आम्ही नियमित टॅक्स भरतो, कुठलाही कर चुकवेगिरीपणा केलेला नाही, असे म्हणत अजित पवारांनी न्यायालयात दाद मागितली होती. अखेर, दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने अजित पवारांना मोठा दिलासा देत आयकर विभागाचे अपील फेटाळले आहे. तसेच, अजित पवारांची जप्त संपत्ती मुक्त करण्याचे आदेशही दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com