Ajit Pawar NCP : राष्ट्रवादीच्या पराभूतांना अजितदादांचे टॉनिक; ‘मी तुमच्या पाठीशी; संपूर्ण ताकदीनिशी काम करा...’

Assembly Election 2024 : पराभूत उमेदवारांनी मित्रपक्षाच्या मदतीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले. अनेक उमेदवारांनी भाजपच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
NCP Defeat Candidate Meeting
NCP Defeat Candidate MeetingSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 06 December : विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत देवगिरी बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत अजितदादांनी संबंधित उमेदवारांकडून पराभवाची कारणे जाणून घेतली. तसेच, अजित पवारांनी सर्व पराभूत उमेदवारांना आपण तुमच्या पाठीशी ताकदीने उभे राहू. आगामी काळात संपूर्ण ताकदीनीशी काम करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाट्याला पन्नासपेक्षा अधिक जागा आल्या होत्या. त्यातील ४१ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. काही जागांवर विद्यमान आमदारांना पराभवाला समोरे जावे लागले होते. त्या माजी आमदारांसह नवख्या उमेदवारांचीही बैठक देवगिरी बंगल्यावर झाली.

या बैठकीला मागील पंचवार्षिकमध्ये आमदार असलेले यशवंत माने, देवेंद्र भुयार, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरे, अतुल बेनके आणि राजेश पाटील हेही उपस्थित होते. या बैठकीत पराभवाच्या संदर्भात चर्चा झाली. पराभूत उमेदवारांनी मित्रपक्षाच्या मदतीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले. अनेक उमेदवारांनी भाजपच्या (BJP) भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

NCP Defeat Candidate Meeting
Markadwadi Ballot Voting : राहुल गांधींच्या नेतृत्वात मारकडवाडीतून ईव्हीएमविरोधात लाँग मार्च निघणार; राष्ट्रवादीचा आमदार आक्रमक

देवेंद्र भुयार, बाळासाहेब आजबे आणि राजेश पाटील यांच्या विरोधात थेट भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. तसेच, सुनील टिंगरे यांच्या विरोधात जगदीश मुळीक यांनी भूमिका घेतली होती. मात्र, फडणवीसांच्या फोननंतर मुळीक यांनी अर्ज भरण्याचा निर्णय मागे घेतला होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत किती फायदा झाला, हे निकालानंतर समोर आलेले आहे.

अतुल बेनके यांच्या विरोधात महायुतीतील शिवसेनेसोबत असणारे माजी आमदार शरद सोनवणे हे निवडून आले आहे. ते निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. मात्र, जुन्नर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात बेनके यांचा पराभव झाला.

NCP Defeat Candidate Meeting
Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात फडणवीसांचा मोठा निर्णय; थेट सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना...

अजित पवार यांनी सर्व पराभूत उमेदवारांना ‘मी पाठीशी आहे, ’ अशा शब्दांत ताकद दिली. तसेच, आगामी काळात पूर्ण ताकदीनीशी काम करा. पुढच्या निवडणुकीत कसा जिंकून येणार, यासंदर्भात काम करावे, अशा सूचना अजितदादांनी पराभूत उमेदवारांन दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com