
New Delhi News : महाराष्ट्राच्या राजकारणातील मुत्सद्दी नेते,खासदार शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता.12) पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गज नेतेमंडळींनी त्यांच्यावर भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव केला. पण याचवेळी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) सहकुटुंब शरद पवारांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या दीड वर्षांनंतरच्या पहिल्याच भेटीत शरद पवारांनी अजितदादांना एक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवारांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचं दिल्लीतील निवासस्थान गाठलं. या भेटीनंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत आतमध्ये काय घडलं हे सांगितलं. ते म्हणाले,शरद पवारांसोबत राजकीय चर्चा झाली. त्यात त्यांनी महायुती सरकारमध्ये एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला, बाकी 40 लोकांचा शपथविधी कधी होणार असा सवालही केल्याचं अजितदादांनी यावेळी सांगितलं.
शरद पवारांनी उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. कारण 16 तारखेपासून अधिवेशन सुरू होत आहे.या अधिवेशनात प्रश्न असतात,इतर कामकाज असतं, त्याची उत्तर देण्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री असणं आवश्यक असतं. याचवेळी त्यांनी सरकारमधील उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी हा येत्या 14 तारखेला होईल अशी शक्यताही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी वर्तवली आहे.
अजित पवार हे 40 आमदारांना सोबत घेऊन जुलै 2023 मध्ये महायुती सरकारमध्ये सहभागी झाले होते. यानंतर अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्हही मिळालं. तर शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी चिन्ह देण्यात आलं. पण पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षांमधला वाद लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत टोकाला पोचला होता.
यात लोकसभेला शरद पवारांच्या पक्षाने तर विधानसभेला अजित पवारांच्या पक्षाने जोरदार मुसंडी मारली. लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी तब्बल राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आणत आपल्या नेतृत्वाची चुणुकही दाखवून दिली आहे.
आता शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त झालेली भेट ही काका -पुतण्यामध्ये दिलजमाई होण्याचे संकेत तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांकडून ही भेट वाढदिवसानिमित्त असल्याचे जरी सांगण्यात येत असले तरी त्यामागे नवी राजकीय समीकरणं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.