NCP News : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी रविवारी (ता. १६ जुलै) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. ही चर्चा सुरु असतानाच आज (ता. १७ जुलै) पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासह सर्व आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली.
या भेटीत पक्ष एकसंघ रहावा, यासाठी मंत्री आणि आमदारांनी पवारांना विनंती केली, असे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगतिले. मात्र, आमदार, नेत्यांच्या या विनंतीवर पवारांनी एकच प्रश्न विचारत सर्वांना निर्णय सांगून टाकला. मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर सर्व आमदार अस्वस्थ झाले होते. त्यामुळे त्यांनीही शरद पवार यांना भेटायचे असे सांगितले होते.
अधिवेशनाचे कामकाज उद्या मंगळवार पर्यंत तहकूब झाल्यानंतर सर्वच आमदारांना घेऊन अजित पवार यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले. काही वेळातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि अन्य नेते दाखल झाले. बैठकीत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी आमदारांची भाजपसोबत (BJP) जाण्याची भावना असल्याचे सांगितले.
त्यावर शरद पवार यांनी एकच उत्तर दिले. ते म्हणाले, आयुष्यभर मी यांच्या विरोधात लढलो आणि आता यांच्यासोबत कसे जाऊ? असा सांगत आपला निर्णयच जाहीर करुन टाकला. त्याचवेळी जयंत पाटील यांनी भाजपसोबत न जाण्याबाबत ठाम भूमिका व्यक्त केली.
जयंत पाटील यांनीही अजित पवार गटातील आमदारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. जे झाले ते बरोबर झाले नाही, घाई, गडबडीत निर्णय घेतल्याचे जयंत पाटील म्हणाले. महाविकास आघाडी न सोडण्याच्या आणि भाजपसोबत न जाण्याच्या निर्णयावर पक्ष ठाम असल्याचेही स्पष्ट केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.