NCP Politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सोडली महायुतीची साथ! ठाणे महापालिका स्वबळावर लढणार

Ajit Pawar Thane Municipal Elections : महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ठाणे महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली आहे.
NCP Politics
NCP leaders in Indapur hold intense discussions amid growing factional conflict over the municipal council election. The dispute highlights party divisions under Ajit Pawar’s leadership.Sarkarnama
Published on
Updated on

राहुल क्षीरसागर

Thane News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढवाव्यात याबाबत महायुतीतील वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले आहे. मात्र स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांचे एकमत होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी घोषणा करत ठाणे महापालिका स्वबळावर लढण्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे महायुतीत बिघाडी झाली असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्रित निवडणूक लढविल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील महायुती म्हणूनच निवडणुका लढविण्याचे एकमत वरिष्ठ नेत्यांमध्ये झाले आहे.मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात शिंदेसोबत युती तर अजित पवारांसोबत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे सांगितले.

दोन दिवसांपूर्वी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी महायुतीतच निवडणुका लढण्याचे जाहीर केले होते. असे असले तरी, दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी या युतीपासून अलिप्त असल्याचे चित्र आहे.

NCP Politics
Abdul Sattar News: अब्दुल सत्तारांना मतदारांनी चक्क घोड्यावर बसवलं!

कार्यकर्त्यांच्या भावना कळवल्या

नजीब मुल्ला यांनी सांगितले की, आम्ही महायुतीचा घटक पक्ष असून महायुतीचा एक अंग आहोत. असे असले तरी, आम्ही ठाणे महापालिका निवडणुकांबाबत भूमिका मांडली आहे की, आम्ही भाजप आणि शिवसेनेसोबत युती करणार नाही. तशा भावना आम्ही वरिष्ठ नेत्यांना कळविल्या आहेत.

NCP Politics
Ashok Chavan News: हेच खरं विकासाचं चित्र! अशोक चव्हाणांचा मोदी सरकारवर कौतुकाचा वर्षाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com