Ashok Chavan News: हेच खरं विकासाचं चित्र! अशोक चव्हाणांचा मोदी सरकारवर कौतुकाचा वर्षाव

Ashok Chavan News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या अकरा वर्षाच्या काळात देशातील गरीब घटक सक्षम झाल्याचा दावाही अशोक चव्हाणांनी केला आहे.
 PM Narendra Modi and Ashok Chavan News
PM Narendra Modi and Ashok Chavan NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या अकरा वर्षाच्या काळात देशातील गरीब घटक सक्षम झाला आहे. हेच खरे विकासाचे चित्र असल्याचा दावा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. सन 2011 ते 2024 या काळातील तुलना आणि त्याच्या अहवालाचा दाखला देत चव्हाण यांनी मोदी सरकारचे कौतुक केलं आहे.

 PM Narendra Modi and Ashok Chavan News
Shashi Tharoor: 'मनरेगा'च्या वादावर शशी थरुरांनी व्यक्त केली सडेतोड भूमिका; म्हणाले, राम राज्याची संकल्पना...

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून ते मोदींच्या कामाचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत. अगदी काँग्रेसच्या काळापेक्षा मोदी सरकारच्या काळातील विकासकामाचा वेग हा कितीतरी पटीने अधिक असल्याचे चव्हाण यांनी म्हटले होते. आता अकरा वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृवात देशातील गरीब घटक सक्षम होत असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. हे पटवून देताना त्यांनी काही आकडेवारी सांगितली आहे.

 PM Narendra Modi and Ashok Chavan News
Nagpur News: नागपूर महापालिकेची निवडणूक घोषित पण आरक्षणामुळं पुन्हा...; नेमकं काय घोळ झालाय?

गरिबांच्या जीवनात परिवर्तन आणणारा आणि अंतर कमी करणारा प्रवास हा सगळा प्रवास आहे. गेल्या 11 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार यांच्या सरकारने देशातील सर्वात गरीब घटकांना कसे सक्षम केले, हे आकडेवारीतून स्पष्टपणे दिसून येते. 2011–12 ते 2023–24 या कालावधीत आर्थिकदृष्ट्या देशातील शेवटच्या स्तरातील 40 टक्के लोकांच्या जीवनशैलीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. चार चाकी वाहनांच्या मालकीचे ग्रामीण भागातील प्रमाण हे 6.2 वरून थेट 47.1 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तसेच मोबाईल कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही मोठी प्रगती झाली आहे. मोबाईल फोन आता जवळपास सर्वत्र पोहोचले आहेत. 94 टक्के कुटुंबांकडे मोबाईल उपलब्ध असल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी अहवालाचा दाखला देत केला आहे.

 PM Narendra Modi and Ashok Chavan News
Voter App : मतदान केंद्रावर नाव शोधण्यात वेळ वाया घालवू नका! निवडणुका आयोगानं आणलंय 'हे' खास अॅप

सुविधा व सन्मान वाढला असून रेफ्रिजरेटर सारखी वस्तू आता लक्झरी वस्तू न राहता घराघरातली आवश्यक वस्तू ठरत आहे. हेच खरे विकासाचे चित्र आहे. आकांक्षी भारत उभारी घेत आहे, आर्थिक दरी कमी होत आहे, आणि आपल्या गावागावांत समृद्धीची एक मूक क्रांती आकार घेत आहे, असे गौरवोद्दगारही अशोक चव्हाण यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमधून काढले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com