Ajit Pawar On Lok Sabha : अजितदादांचं ठरलं ! लोकसभेच्या 'या' चार जागा लढणारच...

Ajit Pawar On Lok Sabha Election : जाहीर मंचावरून सांगून टाकलं, एकदा ठरलं म्हणजे ठरलं..
Ajit Pawar On Lok Sabha :
Ajit Pawar On Lok Sabha : Sarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) दोनदिवसीय शिबिराचे आयोजन कर्जत या ठिकाणी करण्यात आले आहे. या शिबिराचा आज दुसरा दिवस आहे. यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. यापुढील पक्षाची दिशा, वाटचाल आणि निवडणुकांची तयारी कशाप्रकारे करायची, याबाबत वरिष्ठ नेत्य़ांनी मार्गदर्शन केले, तर लोकसभेच्या जागांबाबत अजित पवार यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे.

Ajit Pawar On Lok Sabha :
Ajit Pawar Live : 'बारामती लोकसभा आम्हीच लढवणार'; अजित पवारांची मोठी घोषणा | Baramati Constituency

अजित पवार म्हणाले, "लोकसभेच्या चार जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड आपण लढवणारच आहोत. पण त्याचसोबत ठाकरे गटाचा उमेदवार जिथे असेल अशा काही महत्त्वाच्या जागांवर आपण मित्र पक्षांशी चर्चा करून, आपण त्या ताकदीने लढवणार आहोत. अजूनही आमची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी याबाबत सुरुवातीची प्राथमिक चर्चा केली. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर आपण बसूया, असं आम्हा लोकांचं ठरलेलं आहे, निवडून येण्याची क्षमता पाहून पक्ष उमेदवारी देईल."

Ajit Pawar On Lok Sabha :
Supriya Sule : ''...त्यामुळे 'राष्ट्रवादी' कोणाची हे वेगळं सांगायची गरज नाही'' ; सुप्रिया सुळेंचे विधान!

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार म्हणाले, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आणि नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर एनडीएचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची तिसऱ्यांदा निवड व्हावी, ही आपली इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला काम करायचे आहे. सर्वात जास्त खासदार महायुतीचे निवडून आले पाहिजेत, यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे, असा आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com