Eknath Shinde : अयोध्येतील सोहळ्याचे आमंत्रण मिळताच मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; म्हणाले...

Ayodhya Ram Mandir : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षाच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

पंकज रोडेकर

Thane Political News : अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षाच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

याच भावनेतून भारतीय जनता पक्षाचा जुना सहकारी आणि एनडीएमधील प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेनेलाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानुसार शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना आमंत्रण मिळाले असून या सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचे त्यांनी मान्य केले आहे.

Eknath Shinde
Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंना मात देण्यासाठी ठाकरे पिता-पुत्राचे ठाणे-कल्याणमध्ये 'ठाण'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कोकण प्रांत संपर्कप्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी सोमवारी सकाळी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन त्यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या आमंत्रणाचा मान राखून अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जावे, अशी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. स्वर्गीय आनंद दिघे यांनीही अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी ठाण्यातून चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती, या आठवणींनाही शिंदेंनी उजाळा दिला.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, रामजन्मभूमी आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या साऱ्यांचे स्वप्न साकार होत असताना हा क्षण प्रत्यक्ष उपस्थित राहून 'याचि देही याचि डोळा' पाहणे ही आपल्यासाठी परमभाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे अयोध्येतील या अभूतपूर्व सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहू, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

राज्यात विविध कार्यक्रम

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातही 18 ते 22 जानेवारीदरम्यान विविध उपक्रमांनी हा क्षण सणाप्रमाणे साजरा करावा, असे आवाहन शिवसैनिक आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

यासाठी घरावर भगवे ध्वज, दारासमोर पणत्या, परिसरात भगव्या पताका आणि मंदिरांना विद्युत रोषणाई करण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले आहे. त्यासोबतच पक्षाच्या मुख्य नेत्याला या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाल्याने पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Eknath Shinde
Nanded Loksabha News : डेंजर झोनमध्ये असलेल्या नांदेडमधून भाजपाचे अनेक इच्छुक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com