Ajit Pawar News : अजित पवारांचा दिल्ली दौरा रद्द ; काय आहे कारण?

Ajit Pawar Delhi Tour Canceled News : "अमित शाह यांना निघाली महत्त्वाची कामे.."
Ajit Pawar News
Ajit Pawar News Sarkarna
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दिल्लीत भेट होणार होती. यामुळे हे तिन्ही नेते आजच दिल्लीसाठी रवाना होणार होते. कृषी आणि सहकार क्षेत्राशी संबंधित काही प्रश्नांवर ही भेट नियोजित होती. मात्र आता ही भेट पुढे ढकलण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. ही भेट आता येत्या सोमवारी किंवा मंगळवारी होणार असल्याचे पवारांनी सांगितले. (Latest Marathi News)

Ajit Pawar News
Winter Session 2023 : झिरवळांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवलं नाही; अजित पवार नाराज...

अजित पवारांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दौरा रद्द झाल्याचे सांगितले. अजित पवार म्हणाले, "केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आम्हाला आज भेटीची वेळ दिली होती. मात्र आज सकाळी त्यांचा निरोप आला की त्यांना काही महत्त्वाची कामे निघाली आहेत. त्यामुळे आजचा आमचा जो दिल्लीचा दौरा होता, तो सोमवारी किंवा मंगळवारी होणार आहे. काही प्रश्नांबाबत आम्ही केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार होतो. पण आता शनिवार-रविवार सुट्टी असते. त्यामुळे ही भेट पुढे ढकललेली आहे," असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar News
Politcal News : मुख्यमंत्र्यांचे ठरले ? बालेकिल्ल्यात भाजप नव्हे तर शिवसेनाच, तयारीलाही लागले!

अजित पवार पुढे म्हणाले, अधिवेशन संपण्याआधी शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करणार आहे. शेतकऱ्यांना मदत करायची ही सरकारची भूमिका आहे. सर्व आमदारांनीही समान निधी देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. पीएच.डीचा विषय आता उकरुन काढू नका, माझ्यासाठी तो विषय संपला आहे, असेही ते म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com