Politcal News : मुख्यमंत्र्यांचे ठरले ? बालेकिल्ल्यात भाजप नव्हे तर शिवसेनाच, तयारीलाही लागले!

Shivsena News : ठाणे, कल्याण लोकसभा मतदार संघावर शिवसेना शिंदे गट व भाजप दावे करण्यात येत आहेत.
CM Eknath Shinde & Dy. CM Devendra Fadanvis
CM Eknath Shinde & Dy. CM Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

राहुल क्षीरसागर

loksabha Election : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षाकडून सुरु करण्यात आली आहे. विशेषतः महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये काही जागावरून मतभेद आहेत. महायुतीचे जागावाटप झाले नसतानाही विशेषतः ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघावर शिवसेना शिंदे गट व भाजप दावे करण्यात येत आहेत. त्यामुळे या दोन जागेवरून कलगीतुरा रंगला आहे.

शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना हे समीकरण आहे. मात्र, गेल्या दीड ते दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत, भाजपसोबत राज्याच्या सत्तेत सहभागी झाले. असे असले तरी, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा भाजपकडून ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघावर दावे करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता, शिवसेनेन देखील आक्रमक पवित्र घेत, रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यात काही दिवसांपूर्वी ठाण्यातील आनंद आश्रमात एक बैठक घेत, ठाणे, कल्याणसह भिवंडी लोकसभेवरही दावा करण्यात आला.

त्यानंतर बुधवारी रात्री बैठक घेत, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विधानसभानिहाय बैठकांचा सपाटा सुरु असतांना ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने हा बालेकिल्ला आपल्याच ताब्यात राहण्यासाठी सर्वांना कामाला लागा ,असे आदेशच या बैठकीत देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.एकीकडे नागपुरात अधिवेशन रंगत असतांना दुसरीकडे ठाण्यात आनंद आश्रम येथे शिवसेनेची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. 

CM Eknath Shinde & Dy. CM Devendra Fadanvis
Siddharth Shirole : यासाठी रात्रीच्या वेळी चालणारी बांधकामे बंद करा..

आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ अधिक ही मोहीम घेत भाजपकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chnadrshekhar Bawnakule)हे प्रत्येक जिल्ह्यात जावून भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी संवद साधत आहेत. त्यात राज्यात शिवसेना आणि भाजप हातात हात घालून काम राज्याचा गाडा हाकला जात आहे. असे असताना,  ठाण्यात भाजप आणि शिवसेनेच्या पदधिकाऱ्यानी एकमेकांवर चिखलफेक आणि दावे प्रतिदावे आजही सुरु आहेत. 

यापूर्वी भाजपच्या काही नेत्यांकडून ठाणे आणि कल्याण लोकसभेवर दावा करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा काही दिवसांपूर्वी कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण लोकसभेवरुन शिवसेनेला डिवचले. त्यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्र घेत, आनंद आश्रम येथे बैठक घेत ठाणे, पालघर, कल्याणसह भिवंडी लोकसभेवर काही दिवसांपूर्वी दावा केला.

त्यानंतर बुधवारी ठाण्यातील माजी नगरसेवक व इतर पदाधिकाºयांची बैठक आनंद आश्रम येथे पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत ठाणे लोकसभेबाबत काही महत्वाच्या मुद्यांवर उपस्थितांनी मार्गदर्शन केले. यात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा अशा सुचना करण्यात आल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाणेच नाही तर ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील ठाण्याचेच आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वांनी तळागळापर्यंत जाऊन काम करण्याच्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या. काही दिवसांपासून शिवसेनेकडून विधानसभानिहाय बैठका आणि छोटे खानी मेळावे घेतले जात आहेत. नुकतेच ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदार संघात अशाच पध्दतीने बैठक झाली होती. ठाण्यातील सहा विधानसभा मतदार संघात अशाच पध्दतीने बैठका घेण्याचा सपाटा शिवसेनेकडून लावला गेला आहे. या बैठकीत देखील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा

बुधवारी झालेल्या बैठकीत देखील शासनाने आणलेल्या प्रत्येक योजना या जनतेपर्यंत नेण्याचे काम करा, मतदारांना काय हवे, त्यांच्या काय समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा, बुथ लेव्हलला देखील कार्यकर्त्यांची फळी उभारण्याबरोबर त्यांना देखील कामाला लागा, असा संदेश देण्यात आला. त्याअनुषंगाने प्रत्येक महत्वाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या खांद्यावर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काही महत्वाच्या जबाबदाऱ्या देखील टाकण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा

महापालिका क्षेत्रातील माजी नगरसेवकांची व विभाग प्रमुखांची संघटनात्मक बैठक घेण्यात आली होती. यात संघटनात्मक कार्यक्रम तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली असल्याचे शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sachin Waghmare)

CM Eknath Shinde & Dy. CM Devendra Fadanvis
बावनकुळे म्हणाले, आज महाविकास आघाडी सरकारचा डाव यशस्वी झाला…

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com