Ajit Pawar Group News : अजितदादांचं बंड यशस्वी? दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा; शरद पवारांकडे किती आमदार...

Ajit Pawar's Group has Support of 32 MLAs: अजित पवार याचे बंड यशस्वी झाल्याची चर्चा आहे.
Ajit Pawar, Sharad Pawar News
Ajit Pawar, Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pawar vs Pawar : अजित पवार याचे बंड यशस्वी झाल्याची चर्चा आहे. शरद पवार आणि अजित पवारांच्या बलाबलाची संख्या समोर येत आहे. अजित पवार यांच्या बैठकीला ३२ आमदारांची उपस्थिती असल्याची माहिती आहे. तर शरद पवार यांच्या गटाकडे १३ आमदार हजर राहिल्याचे समोर यते आहे. त्यामुळे अजित पवार गटाला बहुमत असल्याचे स्पष्ट होत आहे. आमदारांच्या बलाबलनंतर शरद पवारांना मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.

शपथविधीदरम्यान, अजित पवारांना (Ajit Pawar) 35 आमदारांनी पाठिंबा दिला होता. मात्र, काही आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे गेले होते. त्यामुळे आता या दोन्ही गटाच्या बैठकांना उपस्थित असलेल्या आमदारांची संख्या समोर येत आहे. अजित पवार यांच्या गटाचा मेळावा सुरु झाला आहे. यामध्ये छगन भुजबळ यांचे भाषण सध्या सुरु आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar News
NCP Crisis News Live: अजितदादांनी फडकवला राष्ट्रवादीचा झेंडा; बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांची संख्या आली समोर.

तर वाय. बी. सेंटरमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत. शरद पवार थोड्याच वेळात येथे पोहचणार आहेत. राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून धुसफूस होती. ही धुसफूस दोन-तीन दिवसांपूर्वी उफाळून आली आहे. राष्ट्रवादीच्या संघटनात्मक निर्णयाबाबतच्या बैठकीआधीच अजित पवारांनी आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात भूकंप झाला.

Ajit Pawar, Sharad Pawar News
Maharashtra Political Crisis : वाय. बी. चव्हाण सेंटरच्या आवारात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी!

अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवार समर्थकांच्या 9 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवारांसह शपथ घेतलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. जयंत पाटलांच्या आधीच अजित पवारांनी जयंत पाटलांसह जितेंद्र आव्हाडांवर कारवाई करण्याबाबत याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com