Maharashtra Political Crisis : वाय. बी. चव्हाण सेंटरच्या आवारात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी!

NCP MLAs Attend Meeting : दोन्ही गट बैठकांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन
NCP MLAs Attend Meeting :
NCP MLAs Attend Meeting : Sarkarnma
Published on
Updated on

Latest News On NCP Meeting : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचा गट शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवारांच्या बंडामुळे राज्यातील राजकारणात भूकंप आला आहे. यावर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

NCP MLAs Attend Meeting :
Supriya Sule on Ajit Pawar: अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांची साथ...? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची आज मुंबईत बैठक आहे. दोन्ही गट बैठकांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करत आहेत. या दोन्ही बैठकीसाठी राष्ट्रवादीचे आमदार मुंबईकडे रवाना झाले आहे. या बैठकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे.

‘आम्हीच खरे राष्ट्रवादी’ असा दावा करणारे शरद पवार व अजित पवार बुधवारी मुंबईत स्वतंत्र बैठकांद्वारे शक्तिप्रदर्शन करीत आहेत. भाजपला पाठिंबा देण्याबाबत ४० आमदारांच्या सह्यांचे आपल्याकडे पत्र आहे. त्यामुळे पक्ष व चिन्ह आमच्याकडेच असा दावा अजित पवार गटाने केला आहे. तर अनेक आमदार आमच्याकडे परत येत असल्याचा दाव शरद पवार गटाने केला आहे.

NCP MLAs Attend Meeting :
Sharad Pawar News : अजित पवारांच्या शुभेच्छा फलकावर नाही शरद पवारांचा फोटो; पवार म्हणतात, साहेबांच्या आदेशाचे पालन केले !

शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक सुरू झाले आहे. पवारांच्या एकूण १२ आमदारांचे संख्याबळ असल्याचे समजत आहे. तर, आता पवार यांच्या बैठकीसाठी आतापर्यंत ९ आमदार उपस्थित झाले आहेत. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे उपस्थित झाले आहेत. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com