NCP Crisis News Live: अजितदादांनी फडकवला राष्ट्रवादीचा झेंडा; बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांची संख्या आली समोर.

NCP Crisis Live News Updates: : राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत.
Maharashtra Political Crisis | Ajit Pawar
Maharashtra Political Crisis | Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रातील राजकारण पेटलं आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर दोन्ही गटाची आज (बुधवारी) मुंबईमध्ये बैठक आहे. अजित पवार गटाच्या बैठकीला सुरवात झाली आहे. एमईटीच्या सभागृहात ही बैठक होत आहे. (Latest News On NCP Meeting)

अजित पवारांची बैठकीपूर्वी एमईटीच्या प्रागंणात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भूजबळ, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते. या बैठकीला सध्या 30 आमदार उपस्थित आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर दोन्ही गटाकडून दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या गटाची बैठक नरिमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये बोलावल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि पक्षाचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. (Political Breaking News)

Maharashtra Political Crisis | Ajit Pawar
Rohit Pawar On Lok Sabha : मध्यावधी निवडणुकांबाबत पवाराचं मोठे विधान ; म्हणाले, "डिसेंबरमध्ये.."

तर नवनियुक्त मंत्री आणि अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनीही राष्ट्रवादीची बैठक वांद्राच्या एमईटी कॉलेजमध्ये सुरु आहे दोन्ही बैठका एकाच दिवशी असल्याने या बैठकींच्या उपस्थितीवरून कोणत्या गटाकडे किती आमदार आहेत हे काही तासांमध्येच कळेल.

दोन जुलैरोजी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. अजित पवारांसह राष्ट्रवादीतील नऊ आमदार शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाची आज मुंबईत बैठक आहे. दोन्ही बैठकांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. (Maha Political Twist)

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com