Maharashtra Politic's : अजितदादा धनंजय मुंडेंची विकेट काढणार अन्‌ भुजबळांना मंत्री करणार? ;ओबीसी नेत्याचा मोठा दावा

Vijay Wadettiwar On Bhujbal, Munde : छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करून काय फायदा, त्यांच्यापुढे पर्याय काय आहे? त्यांच्या समोर भारतीय जनता पक्षाकडे जाण्याचा एक पर्याय आहे. नाही तर दुसरा घरी बसण्याचा पर्याय आहे.
Dhananjay Munde-Vijay Wadettiwar-Chhagan Bhujbal
Dhananjay Munde-Vijay Wadettiwar-Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 02 January : राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. नाशिकमध्ये समर्थकांच्या मेळाव्यात आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली होती. राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या भुजबळांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्या भेटीनंतर भुजबळ हे परदेशात गेले होते, त्यामुळे राजकीय घडामोडींपासून ते दूर आहेत. मात्र, ओबीसी नेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी भुजबळ आणि धनंजय मुडे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे.

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करून काय फायदा, त्यांच्यापुढे पर्याय काय आहे? त्यांच्या समोर भारतीय जनता पक्षाकडे जाण्याचा एक पर्याय आहे. नाही तर दुसरा घरी बसण्याचा पर्याय आहे. ओबीसी नेत्यांचा महाराष्ट्रात ज्या पद्धतीने वापर करून त्यांचा दुरुपयोग केला किंवा त्यांना सत्तेच्या बाहेर ठेवले. एवढ्या मोठ्या वरिष्ठ नेत्याला, ज्यांच्यामुळे महायुतीला मतं मिळाली, त्याचा फायदा प्रचंड मोठ्या प्रमाणात महायुतीला झाला आणि छगन भुजबळांच्या हातात भोपळा दिला आहे.

ते म्हणाले, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यापुढे फार काही पर्याय नाहीत. कदाचित, अजितदादांच्या चुप्पीवरून कदाचित धनंजय मुंडेंची विकेट काढून टीममध्ये भुजबळ यांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का? हा प्रश्न आम्हाला गेल्या चार ते पाच दिवसांपासून आम्हाला पडत आहे. त्यावर अजित पवार धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात अजिबात बोलत नाहीत. ज्या वेळी मुंडेंच्यावर दुसऱ्या बायकोने आरोप केला, ती नावही लिहिते त्यांचं. अशा प्रकरणात वैयक्तिक कोणी पडू नये, असं म्हटलं गेलं.

Dhananjay Munde-Vijay Wadettiwar-Chhagan Bhujbal
Santosh Deshmukh Case : सीबीआयपाठोपाठ आता एसआयटीही ॲक्शन मोडवर; स्थापना होताच घेतला असा निर्णय

धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) दुसऱ्या बायकोने केलेले आरोप गंभीर होते. मुलांचं नावं आहे. त्यावर मी जास्त बोलत नाही. आता मात्र धनंजय मुंडेंवर चोहोबाजूंनी आरोप होत असताना अजितदादा हे शांत बसले आहेत. त्यामुळे मला वाटतं कुछ तो गडबड है. त्यामुळे छगन भुजबळ यांना वेट ॲन्ड वॉचची भूमिका ठेवावी लागेल. नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पर्याय आहे. भेटीत काही तरी झालंच असेल. भाजप त्यांना देशाचा ओबीसींचा नेताही करून टाकेल. तोही पर्याय छगन भुजबळ यांच्यापुढे राहील, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.

Dhananjay Munde-Vijay Wadettiwar-Chhagan Bhujbal
Rohit Pawar : वाल्मिक कराड असलेल्या पोलिस ठा‎ण्यात 5 नवे पलंग‎ मागवले, प्रशासनाने स्पष्टीकरण देताच रोहित पवारांनी साधलं अचूक टायमिंग

राज्यातील महायुतीचे सरकार हे जनतेच्या भावनाशी खेळणारे आहे. ओबीसींची बनवाबनवा करणारं हे सरकार आहे. ओबीसींना गृहीत धरून राज्य करणारे हे सरकार आहे, हे आता स्पष्ट झालेले आहे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com