Pawar-Shinde Politics : अजितदादांचा एक प्रश्न अन् शिंदे गट अस्वस्थ; भाजपचीही तारेवरची कसरत

Maharashtra Politics : अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून शिंदे- पवारांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे.
Pawar-Shinde Politics :
Pawar-Shinde Politics :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वातील अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व अजित पवार यांचा गट एकमेकांवर कुठले ना कुठले निमित्त करून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यातच ठाण्यातील रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट विचारणा केल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्याकडून भावी मुख्यमंत्री होणाऱ्या उल्लेखाने व पवार गटाकडून मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न केले जात असावेत, या शंकेने शिंदे गटात नाराजी आहे. अजितदादांना वेळीच आवरावे, अशी मागणी शिंदे यांचे निकटवर्तीय भाजपच्या नेत्यांकडे करणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शिंदे आणि पवार यांच्यात झालेली कटुता भाजप नेतृत्व कोणाला झुकते माप देईल, याचीही चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.

Pawar-Shinde Politics :
Shambhuraj Desai News : मुख्यमंत्री शिंदेंची ठाण्यावर ममता, 'सरोगेट पालकमंत्री' हवेतच कशाला ? स्थानिक आमदारांमध्ये कुजबुज..

अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादीला सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. कृषीसह काही महत्त्वाची खाती शिंदे गटाला गमवावी लागल्याने मंत्र्यांमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. त्यातच ‘तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे’ असा थेट सवाल अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला. त्यावर शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. हा वाद आणखी वाढू नये म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूळ विषयाला बगल दिली. त्यामुळे या विषयावर शिंदे आणि पवार यांच्यात पुढे संवाद झाला नाही.

ठाण्यातील घटनेचे निमित्त करून राजकीय कुरघोडी करण्याच्या अजित पवार यांच्या प्रयत्नांबद्दलही शिंदे गटात नाराजी आहे. अजित पवार यांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे. राष्ट्रवादीत बंड केल्यापासून ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून होणारा त्यांचा उल्लेखही शिंदे गटाच्या आमदारांना खुपतो आहे. शिंदे गटाच्या काही नेत्यांनी फडणवीस यांच्याकडे वस्तुस्थिती काय आहे, अशी विचारणा केली होती. त्यानंतर शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे या वादावर पडदा पडला असे वाटत असतानाच पुन्हा यामध्ये पवार गट आक्रमक झाला आहे.

Pawar-Shinde Politics :
Shivsena News : एकनाथ शिंदे नव्हे गुजरातची लॉबी चालविते राज्यातील सरकार

भाजप नेतृत्व कोणाला झुकते माप देणार ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सवाल केल्याने शिंदे यांना ते फारसे रुचले नसल्याची चर्चा शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये आहे. अशा वेळी भाजपनेते आणि विशेषत: फडणवीस यांची भूमिका काय असेल याकडे शिंदे गटाचे लक्ष आहे. अजित पवार यांना भाजपबरोबर घेण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भूमिका महत्त्वाची होती. यामुळेच शिंदे आणि पवार यांच्यात आणखी कटुता निर्माण झाल्यास भाजप नेतृत्व कोणाला झुकते माप देईल, याचीही चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. आगामी काळात भाजपाला हा दोन पक्षातील वाद मिटवून एकत्र काम करीत असताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com