Akshay Shinde News : दोन लहान मुलींवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर पोलिसांनी 23 सप्टेंबरला केला होता. अखेर सात दिवसानंतर आज (रविवारी) उल्हानसगरमधील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षयचा दफनविधी करण्यात आला.
स्थानिक नागरिकांनी अक्षय शिंदेंच्या दफणविधीला विरोध केला होता. मात्र, या विरोधानंतर देखील पोलिसांनी शांतीनगर स्मशानभूमीत अक्षयच्या मृतदेहाचे दफन केले.
कळव्यातील रुग्णालयामधील शवागृहात अक्षयचा मृतदेह ठेवण्यात आला होता. शांतीगरमधील स्मशानभूमीत त्याचे दफन करणयात येण्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी खोदलेल्या खड्डा देखील बुजवण्याचा प्रयत्न केला.
स्थानिकांच्या विरोधामुळे शांतीनगर स्मशानभूमी बाहेर तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी काही विरोध करणाऱ्यांना ताब्यात घेतले तसे कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करत असल्याचे सांगत स्थानिकांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला.
अक्षय हा निर्दोष असल्याचा दावा त्याचा आई वडिलांनी केला होता. त्यांच्या वकिलाने सांगितले, पुरावे नष्ट होऊ नये म्हणून अक्षयच्या मृतदेहाचं दहन नाही तर पुरणार आहोत. ज्यामुळे भविष्यात भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.