भंडारा : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये डॉ. भागवत कराड यांची स्थिती काय आहे, हे त्यांनी आधी प्रामाणिकपणे सांगावे. इतर पक्षांच्या आमदारांना भाजपमध्ये घेण्याच्या बाता त्यांनी करू नये. त्यांचेच अनेक आमदार इतर राजकीय पक्षांमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत, हे त्यांना कदाचित माहिती नसेल. मोदी सरकारमध्ये त्यांचीच फाईल मार्गी लागत नाही, त्यामुळे त्यांना आम्हाला शिकवू नये, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
भाजपचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagawat Karad) यांना महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर नाराज आमदारांनी भाजपसोबत यावे, अशी ऑफर दिली आहे, यावर बोलताना नाना पटोले (Nana Patole) यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिला. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील त्यांच्या सुकळी या गावी ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारमध्ये कराड मंत्री आहेत. त्यांना किती अधिकार आहेत, हे त्यांनी अगोदर सांगावे. खर तर त्यांच्या कुठल्याही फाईल जात नाहीच.
मिडियासमोर बोलून काहीही मिळणार नाही, अशा शब्दांत नाना पटोले यांनी भागवत कराड यांना समज दिली आहे. त्यांनी आपले ज्ञान आपल्याकडेच ठेवावे, असे परखड मत नाना पटोले यांनी व्यक्त केले. खरं पाहिलं तर भाजपचेच लोक नाराज आहेत आणि इतर पक्षांचा पर्याय शोधत आहेत. कराडांनी आधी त्यांच्या पक्षातील आमदारांना सांभाळावं, असा सल्ला नाना पटोले यांनी कराड यांना दिला.
एमआयएमचा प्रस्ताव अद्याप आला नाही..
एमआयएमचा प्रस्ताव अद्याप कॉंग्रेसला प्राप्त झाला नाही. त्यांचा प्रस्ताव आल्यावर विचार करू, असे स्पष्ट मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, इम्तियाज जलील यांचा प्रस्ताव काय आहे, त्यांची मतं काय आहेत हे, जाणून घेऊ त्यांचे मत सेक्युलर व काँग्रेस विचारांशी सहमत असेल तर नक्कीच विचार करू, असे नान पटोले म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.