Ambadas Danve On Mahayuti Government : महायुती सरकार जरांगेंची फसवणूक करतंय; दानवेंनी भडका उडवून दिला

Maharashtra Monsoon Session News : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलाच बसला. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र येथे मनोज जरांगे फॅक्टर महायुतीच्या विरोधात गेला. लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत.
Manoj Jarange, Ambadas Danve
Manoj Jarange, Ambadas Danve Sarkarnama

Mumbai News : मराठा आंदोलन म्हणून जरांगे यांच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नाही. मराठा आरक्षणावर सरकार मराठा आंदोलकांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी केला.

मराठा आरक्षण मिळणार की नाही मिळणार? मिळाल्यास टिकणार का नाही टिकणार? या मुद्द्यावरून मराठा आंदोलन मनोज जरांगे आक्रमक आहेत. यातच शिवसेनेचे नेते विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली. मनोज जरांगे यांची सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप करत सरकार मराठा आरक्षणाबाबत कितपत गंभीर असल्याचे कुठेच दिसत नाही, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले.

विरोधी पक्षनेता अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे गांभीर्य नसल्याचे म्हणत सरकार मनोज जरांगे यांची फसवणूक करत आहे, असा गंभीर आरोप केला. सरकारने 10 टक्के आरक्षण देण्याचे दिलेले आश्वासन देखील पाळते की नाही, याबाबत शंका आहे.

त्यामुळे मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी वारंवार घेत असलेली आक्रमक भूमिका योग्यच आहे. हे सरकार मनोज जरांगे यांची कुठेतरी फसवणूक करत आहे, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले.

Manoj Jarange, Ambadas Danve
Bjp News : मोठी बातमी : भाजपकडून विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, फुकेंना उमेदवारी

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलाच बसला. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र येथे मनोज जरांगे फॅक्टर महायुतीच्या विरोधात गेला. लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत.

विधानसभा निवडणुकीत महायुती कोणताही धोका पत्करणाच्या तयारीत नाहीत. यातच विधानसभा निवडणुकीपूर्वी या सरकारचे पावसाळी अधिवेशन होत आहेत.

या अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारने विविध योजनांचा धडाका लावला आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्याची कसरत देखील पुढील काळात सरकारला करावी लागेल. तसेच महत्त्वाचा मुद्दा मराठा आरक्षण हा देखील मार्गी लावावा लागेल. यासाठी महायुती सरकार अधिवेशनात कसरत करत आहे.

Manoj Jarange, Ambadas Danve
CM Eknath Shinde : 'मदतीचा हात एकनाथ' या फलकातून घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा पुन्हा एकदा खोटारडेपणा; आदित्य ठाकरे कडाडले !

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने निर्णय न घेतल्यास विधानसभा निवडणुकीला सरकारला हिसका दाखवू, असा इशारा दिला आहे. त्यामुळे या अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय होतो. याकडे लक्ष लागले आहे. यातच विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेवर सरकार विरोधात काय पडसाद उमटतात आणि मनोज जरांगे आपल्या आंदोलनाचे दिशा काय ठरवतात, याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com