Dattatray Bharne: 'आमचं ठरत नसतं फिक्स असतं', दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील लढत अटळ?

Harshvardhan patil Vs datta bharne : विधानसभेच्या निवडणूकीत इंदापूरच्या जागेचा तिढा सोडवणं हे महायुतीच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते. काँग्रेसमधून भाजपात गेलेले हर्षवर्धन पाटील यांनी तीनवेळा अपक्ष लढत विजय मिळवला होता.
Harshvardhan patil Vs datta bharne
Harshvardhan patil Vs datta bharnesarkarnama
Published on
Updated on

Datta Bharne News : विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून महायुती वाद होणार हे निश्चित. इंदापूरची जागा अजित पवार गटाकडे आहे. दत्तामामा भरणे येथून आमदार आहेत. मात्र येथूनच भाजपचे नेते, माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे इंदापूर विधानसभेत दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील यांची लढत होणार असल्याचे संकेत त्यांच्या समर्थकांनी बॅनर लावून दिले आहेत.

हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थनार्थ इंदापुरात 'आमचा स्वाभिमान आमचे विमान,आमचं आता ठरलयं लागा तयारीला विधानसभा 2024' अशा आशयाचे बॅनर लावत पाटील अपक्ष लढणार असल्याचे संकेत दिले. तर, याच बॅनर शेजारी 'आमचं ठरत नसतं तर आमचं फिक्स असतं' असा मजकूर आणि दत्तामामा भरणे यांचा फोटो असलेला बॅनर इंदापूर राष्ट्रवादीकडून लावण्यात आला आहे.

विधानसभेच्या निवडणूकीत इंदापूरच्या जागेचा तिढा सोडवणं हे महायुतीच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते. काँग्रेसमधून भाजपात BJP गेलेले हर्षवर्धन पाटील यांनी तीन वेळा अपक्ष लढत विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांचे चिन्ह विमान होते.तेच चिन्ह इंदापूरमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवर आहे.

Harshvardhan patil Vs datta bharne
Jayadatt Kshirsagar : लोकसभेच्या रणधुमाळीत जयदत्त क्षीरसागर 35 वर्षांत पहिल्यांदाच 'Wait & Watch'च्या भूमिकेत!

हर्षवर्धन पाटील Harshvardhan patil 2009 च्या निवडणुकीत ते काँग्रेसकडून विजयी झाले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. महायुतीमध्ये असल्याने ही जागा अजित पवार गटाकडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील यांच्या समर्थकांकडून अपक्ष लढण्यासाठी आत्तापासूनच दबाव वाढतो आहे.

दत्तामामा भरणेंच्या बॅनरवर काय?

विकासाची परंपरा कायम राखुया चला विजयाची हॅट्रीक पूर्ण करुया.आमचं ठरत नसतं तर आमचं फिक्स असतं अशा आशयाचा बॅनर लावण्यात आलाय. मिशन 2024, असा मजकूर आहे. दत्तात्रय भरणे यांचे मोठे छायाचित्र आणि त्यामागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो आहे. बॅनरवर इंदापूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत.

Harshvardhan patil Vs datta bharne
Parinay Phuke-Kripal Tumane : फुके, तुमानेंचे राजकीय वजन वाढले; आमदार होण्यापूर्वीच ‘भावी मंत्री’ म्हणून चर्चेत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com