Ambernath Election : अंबरनाथमध्ये भाजपला मोठा धक्का; शिंदेंनी मनसुबे उधळले, रविंद्र चव्हाणांच्या खेळीला शह देत सत्ता काबीज

BJP setback in Ambernath : भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 अशा एकूण 32 नगरसेवकांची मोट भाजपने बांधली होती.
Eknath Shinde Devendra Fadnavis
Eknath Shinde Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

BJP setback in Ambernath : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तानाट्य संपूर्ण देशभर गाजत आहे. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने थेट कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेससोबत आघाडी केली होती. त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले अन् युती तुटली. काँग्रेसनेही संबंधित नगरसेवकांना निलंबित केले. ही संधी साधत भाजपने या नगरसेवकांना पक्षात घेत पुन्हा सत्तेचा डाव मांडला होता.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी टाकलेला हा राजकीय डाव शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी उधळून लावला आहे. शिवसेनेने यापूर्वी भाजप व काँग्रेसच्या आघाडीला अभद्र म्हटले होते. भाजपने निलंबित नगरसेवकांना पक्षात घेत पुन्हा ती री ओढल्याची चर्चा होती. यापार्श्वभूमीवर संतापलेल्या शिंदेंनी भाजपला शह दिला आहे.

निवडणुकीत शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चार नगरसेवक सोबत घेत ३१ नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाने ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आज सत्तास्थापनेचा दावा केल्याचे समजते. तसे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये शिवसेनेचीच सत्ता असणार, हे स्पष्ट झाले आहे. सर्व नगरसेवक ठाण्यात श्रीकांत शिंदे यांच्यासोबत आनंदाश्रमात होते, अशी माहिती समोर आली आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis
Retired Justice Sandeep Shinde : मोठी बातमी : ‘मराठी-कुणबी’ समितीच्या अध्यक्षांची दुसऱ्या राज्यात लोकायुक्तपदी नियुक्ती, समितीचे काय होणार?

श्रीकांत शिंदे यांच्या या खेळीने भाजपला मोठा धक्का बसला आहे. मागील अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी धक्कादायक निर्णय़ घेत काँग्रेसला जवळ केले होते. त्यामुळे त्याचे पडसाद राष्ट्रीय स्तरावर उमटले होते. निवडणुकीत नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवार निवडून आल्याने कसल्या परिस्थितीत संपूर्ण सत्तेच्या चाव्या आपल्याकडे राहाव्यात, यासाठी भाजपने जोरदार तयारी केली होती.

Eknath Shinde Devendra Fadnavis
Lalu Prasad Yadav : लालू प्रसादांच्या अडचणीत मोठी वाढ! 'लँड फॉर जॉब' प्रकरणात कोर्टाचा दणका; आता थेट...

भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 अशा एकूण 32 नगरसेवकांची मोट भाजपने बांधली होती. पण शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सोबत घेत भाजची बाजू लंगडी केली आहे. महायुतीत असलेल्या या दोन्ही पक्षांमधील सत्तेसाठीच्या या राजकीय चढाओढीची चर्चा संपूर्ण राज्यात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com