Amit Gorakhe : विधानसभेआधीच लॉटरी! अमित गोरखे पिंपरी चिंचवडचे पाचवे आमदार

Vidhan Parishad : देवेंद्र फडणवीसांमुळे उमा खापरेंनंतर अमित गोरखे हे दुसरे एकनिष्ठ भाजपाई विधानपरिषदेवर.
Amit Gorkhe
Amit GorkheSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार जिंकले. त्यात अमित गोरखे या पिंपरी-चिंचवडकरांचा समावेश आहे. त्यांच्या रुपाने दोन वर्षांतच उमा खापरेनंतर शहरातील दुसऱ्या एकनिष्ठ तरुण भाजपाईला विधान परिषदेवर संधी मिळाली. गोरखे 26 मते घेऊन विजयी झाले आहेत.

अमित गोरखे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटच्या वर्तुळातील तसेच विश्वासातील आहेत. त्यांच्या रुपाने विधान परिषेदवर प्रथमच मातंग समाजाला संधी मिळाली आहे. राज्याची विधानपरिषदच नव्हे, तर राज्यसभेतही या समाजाला ती अद्याप मिळालेली नव्हती.

यापूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या समाजातील व्यक्तीला राज्यसभेवर संधी देण्याची मागणी गोरखेंनी फडणवीस आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. राज्यसभेवर नाही, पण नंतर आता विधान परिषेदवर मात्र ही मागणी मान्य झाली.

मुख्यमंत्री असताना फडणवीसांनीच गोरखेंना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले होते. ते राज्यमंत्रिपदाच्या दर्जाचे होते. मात्र, काही महिन्यांतच राज्यात सत्तापालट झाल्याने गोरखेंना फक्त काही महिनेच या पदावर काम करता आले.

त्या कालावधीतही त्यांनी काही शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याने कलंकित झालेल्या या महामंडळाचा डाग पुसण्याचा प्रयत्न केला होता. सध्या ते पक्षाचे प्रदेश सचिव असून फडणवीसांच्या अत्यंत जवळचे आहेत. मागील शहर दौऱ्यात फडणवीस हे गोरखेंच्या घरी आवर्जून गेले. तसेच त्यांच्या आवडीचे जेवणही त्यांनी केले होते.

Amit Gorkhe
Monsoon Assembly Session : राम कदम 'संतापले', उत्तर देताना नाना पटोलेही 'भडकले', विधानसभेत वातावरण तापलं; घडलं काय?

विधानसभेसाठी इच्छुक

उद्योगनगरीतील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीन विधानसभा मतदारसंघापैकी पिंपरी अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहे. तेथून आगामी विधानसभा लढण्याची जोरदार तयारी गोरखेंनी केली होती. त्यादृष्टीने राजकीय मोर्चेबांधणीही केली होती. पण, अजित पवारांची राष्ट्रवादी ही शिंदे शिवसेना आणि भाजपच्या राज्य सरकारमध्ये सामील झाली आणि तेथे गोरखेंना पिंपरीतून पक्षाचे तिकिट मिळण्याची आशा अंधूक झाली.कारण

तेथे अजित पवार समर्थक आमदार अण्णा बनसोडे आहेत. जेथे ज्यांचा आमदार, खासदार तो मतदारसंघ त्या पक्षाकडे हे जागावाटपाच्या सूत्रानुसार ही जागा अजित पवार राष्ट्रवादीला मिळण्याची दाट शक्यता आहे. हे ध्यानात घेऊन त्याअगोदरच फडणवीसांनी आपल्या कट्टर समर्थक गोरखेंना विधान परिषदेचे आमदार करण्याची खेळी हुषारीने खेळली आहे.

फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी

गोरखेंना विधान परिषेदवर संधी देऊन पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपमध्ये व त्यातही जुन्या भाजपाईतील खदखद आणि असंतोष दूर करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला आहे. कारण गेल्या सात वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्यांनी शहर भाजप हायजॅक केल्यासारखी परिस्थिती आहे. त्याबद्दल जुने भाजपाई नाराज होते.

त्यातूनच संधी हुकलेले पिंपरी-चिंचवड महापालकेतील पक्षाचे माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनिष्ठांतील ही नाराजी व असंतोष आगामी विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने घातक ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे भविष्यातील राजकीय पडझड रोखण्यासाठी हे आगाऊ ड़ॅमेज कंट्रोल करण्याची खेळी भाजप व त्यातही फडणवीसांनी केली आहे. त्याला किती यश येते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसणारच आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Amit Gorkhe
Vijay Wadettiwar : राज्यात सत्ता बदलाचं वारं, सत्तेतील अनेकजण विधानपरिषदेत वेगळा निर्णय घेतील; वडेट्टीवारांचा रोख कुणाकडं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com