Vijay Wadettiwar : राज्यात सत्ता बदलाचं वारं, सत्तेतील अनेकजण विधानपरिषदेत वेगळा निर्णय घेतील; वडेट्टीवारांचा रोख कुणाकडं?

Congress Vidhan Parishad : काँग्रेसच्या आमदार फुटले नाहीत, त्यांनी कार्यालयात उपस्थिती लावून काँग्रेसच्याच उमेदवाराला मतदान केले.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : सध्याचे महायुती सरकारमध्ये मनमानी कारभार सुरू आहे. सत्तेतील अनेक आमदारांना त्यांची आमदारकी धोक्यात असल्याचे वाटत आहे. यामुळे राज्यात सत्तांतर होणार आहे.

त्यातूनच विधानपरिषदेत काँग्रेसची मते फुटणार असल्याची अफवा पसरवण्यात आली. मात्र सत्तेतीलच आमदार वेगळा निर्णय घेतील, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

ते म्हणाले, आज होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक अफवांना पेव आले आहे. असे म्हटले जात आहे की काँग्रेसचे मतदान फुटणार आहे. मात्र ती साफ खोटा माहिती होती. जे आमदार फुटणार असे सांगितले जात होते, ते आमदार आज प्रत्यक्ष ऑफिसमध्ये आले. त्यांनी काँगेसलाच मतदान केले, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी राज्यात सत्तांतर होणार, सध्या सरकारकडून मोठ्या प्रमाणात मनमानी कारभार सुरू आहे. एसआरएमध्ये अनेक अधिकाऱ्यांना पैसे घेऊन पर्मनंट करण्यात आले आहे, असे अनेक गंभीर आरोप वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी महायुती सरकारवर केले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत कोट्यापेक्षा जास्त मते आम्हाला मिळतील. आघाडीतील तिन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. वडेट्टीवार म्हणाले, निवडणुकीच्या निकालानंतर कोण किती पाण्यात आहे हे कळेल. काही तासांतच याबाबत चित्र स्पष्ट होईल.

Vijay Wadettiwar
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांचा आणखी एक प्रताप; नवी मुंबई पोलिसांचा गृह विभागाला अहवाल

राज्यात सत्ताबदलाचे वारे जोरात वाहत आहे. महाविकास आघाडीची सत्ता येणार याची आमदारांना गॅरंटी आहे. त्यामुळे सत्तेतील अनेकांना त्यांची आमदारकी धोक्यात आल्याचे वाटत आहे. यातूनच अनेक आमदार वेगळा निर्णय घेतील, हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल, असा दावाच वडेट्टीवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.

80 कोटी अभियांत्यांकडून घेतले

काही अभियंत्यांकडून 80 कोटी रुपये घेऊन त्यांना पर्मनंट एसआरएमध्ये ठेवावे अशा फाईलवर एकनाथ शिंदे यांनी सही केल्याची माहिती आमच्यापर्यंत आली आहे, असा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. काल सीएम यांनी सही करून रिटायरमेंटपर्यंत एसआरएमध्ये या अधिकाऱ्यांना ठेवण्याचा निर्णय घेतला. दहा अभियंते यांनी मोठी रक्कम खर्च करून हा महाघोटाळा केला असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

ही मंडळी म्हाडामधील आहेत. अशा परिस्थतीमध्ये सामान्य प्रशासनमध्ये हा प्रस्ताव गेल्यावर सर्वांना रिटायरमेंटपर्यंत 30 टक्के कोट्यात या अधिकाऱ्यांना पर्मनंट केले ही दुर्दैवाची बाब आहे. ज्यांचा पगार म्हाडामधून निघतो, त्यांच्या पगाराचा भार शासनावर पडणार आहे. नियमबाह्य निर्णय घेणे, मेरी मर्जी कारभार करणे, हा नवीन पायंडा राज्यात पडतोय, याकडेही वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.

(Edited by Sunil Dhumal)

Vijay Wadettiwar
Monsoon Assembly Session : राम कदम 'संतापले', उत्तर देताना नाना पटोलेही 'भडकले', विधानसभेत वातावरण तापलं; घडलं काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com