Lok Sabha Election 2024 : शाहांची स्ट्रॅटेजी 'मॅजिक' घडवणार; महायुतीचा तिढा रात्रीत सुटणार ?

Mahayuti Seat Sharing : महायुतीच्या १५ जागांचा तिढा, मित्रपक्षांच्या मागण्या मोठ्या असल्याने तोडग्यावर भर
Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुका तोंडावर आली तरी राज्यातील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही. परिणामी भाजपने देशभरातील 195 उमेदवारांची यादी जाहीर केलेल्या यादीत राज्यातील एकाचेही नाव आले नाही. हा तिढा सोडवण्यासाठी खुद्द केंद्रीय मंत्री अमित शाहांना (Amit Shah) मंगळवारी राज्यात यावे लागले. अमित शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याची रात्री उशिरापर्यंत चर्चा करणार आहे. त्यामुळे शाहांची स्ट्रॅटेजी मॅजिक घडवून रात्रीत तिढा सोडवणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील (Lok Sabha Election) तब्बल 18 जागांवर शिवसेनेने आणि 10 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. भाजपच्या या दोन मित्रपक्षांनी केलेले दावे अवाजवी आहेत. त्यामुळे सुमारे युतीत 15 जागांबाबत तिढा निर्माण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या मित्रांना नाराज न करता जागावाटपाचे गणित साधणे शाहांपुढे आव्हान आहे. लोकसभेत भाजपने अधिक जागा जिंकणे फायद्याचे असल्याचे शाह राज्यातील नेत्यांना रात्री उशिरापर्यंत समजावून सांगत होते.

Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Deepak Kesarkar News : रश्मी ठाकरे अन् आदित्य ठाकरे हे पंतप्रधान मोदींना भेटले; केसरकरांचा खळबळजनक दावा

बारामती लोकसभा मतदारसंघावर अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चा झाली. त्या वेळी राष्ट्रवादीला हव्या असलेल्या अन्य जागांवरही प्रारंभिक चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच माझ्यावर विश्वास ठेवून महायुतीत प्रवेश केलेल्या शिवसेनेच्या खासदारांना पुन्हा तिकिट देण्याचा शब्द दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. शाह यांनी शिंदेंचे म्हणणे बंद दाराआड ऐकून घेतले. मात्र परिस्थिती योग्य प्रकारे समजावून सांगण्यावर भाजप भर देणार असल्याचे समजते.

रत्नागिरी, मुंबईतील तीन, विदर्भातील तीन तसेच मराठवाड्यातील चार जागांवर तिढा आहे. मंगळवारच्या रात्री झालेल्या चर्चेनंतर बुधवारी पुन्हा सकाळी शाह तिन्ही नेत्यांशी सविस्तर चर्चा करण्याची शक्यता आहे. मित्र गटांच्या मागण्या मान्य करणे शक्य नसले तरी त्यामागचे कारण त्यांना समजावून सांगण्यावर भर दिला जाणार आहे. या चर्चेनंतर महायुतीतील जागावाटपाचा काय फॉर्म्युला असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadnavis : स्वप्न बाळासाहेबांचे, पूर्ण केले अमित शाहांनी; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com