Amol Kirtikar News : 'ठाकरेंच्या बाजुने निकाल, महाविकास आघाडीला 32 जागा मिळणार', उमेदवाराने केला मोठा दावा

Uddhav Thackeray : अमोल किर्तीकर म्हणाले, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती, परंपरा बुडीत निघाली असल्याचे दिसून येत आहे. पक्ष तोडल्याने तर लोकांची घरही तोडली आहेत.
Amol Kirtikar Uddhav Thackeray
Amol Kirtikar Uddhav Thackeray sarkarnama
Published on
Updated on

वैदेही काणेकर

Maharashtra Political News : महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुका संपल्या आहेत. पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांवर निवडणूक झाली. सहा जागांपैकी चार जागांवर ठाकरे गट लढतो आहे. त्यातही तीन जागांवर ठाकरे गटाचा सामना शिंदे गटासोबत आहे. विशेष म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचे वडील विद्यमान खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात आहेत. मुलगा ठाकरेंसोबत असला तरी गजानन किर्तीकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र, निवडणूक झाल्यानंतर शिंदे गटातून गजानन किर्तीकर Gajanan Kirtikar यांच्यावरच टीका करण्यात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी महाविकास आघाडी तब्बल 32 जागा जिंकणार असल्याचे म्हटले आहे.

Amol Kirtikar Uddhav Thackeray
Ambadas Danve News : मुंबईतील कमी मतदानाला कोण जबाबदार? दानवेंचा आयोगावर ठपका!

अमोल किर्तीकर Amol Kirtikar म्हणाले, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती, परंपरा बुडीत निघाली असल्याचे दिसून येत आहे. पक्ष तोडल्याने तर लोकांची घरही तोडली आहेत. हे महाराष्ट्राचे जनतेला आवडलेलं नाही आणि मतदानाच्या माध्यमातून शंभर टक्के लोकांनी दाखवले. राजकीय विश्लेषक म्हणतात की महाविकास आघाडीच्या 32 पेक्षा अधिक सीट येतील. महाविकास आघाडीच्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray यांच्या बाजूने निकाल लागेल.

अमोल किर्तीकर Amol Kirtikar म्हणाले, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती, परंपरा बुडीत निघाली असल्याचे दिसून येत आहे. पक्ष तोडल्याने तर लोकांची घरही तोडली आहेत. हे महाराष्ट्राचे जनतेला आवडलेलं नाही आणि मतदानाच्या माध्यमातून शंभर टक्के लोकांनी दाखवले. राजकीय विश्लेषक म्हणतात की महाविकास आघाडीच्या 32 पेक्षा अधिक सीट येतील. महाविकास आघाडीच्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray यांच्या बाजूने निकाल लागेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकीकडे मुलगा तर दुसरीकडे वैचारिक भूमिका यामुळे शिंदे गटात गजानन किर्तीकर यांची कुंचबना होत असल्याची टीका केली जात होती. त्याला देखील अमोल किर्तीकरांनी उत्तर दिले आहे. वडील म्हणून 100 टक्के त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी होता, आहे आणि राहणार. माझ्यासाठी त्यांनी कुठलाच प्रचार केला नाही किंवा कुठली वैयक्तिक मदत केली नाही . पण गजानन कीर्तिकर यांना घेऊन मत वळवण्यासाठी त्यांचा पक्ष ,उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते अयशस्वी ठरले आहेत. म्हणून अशी कुचंबनेची वक्तव्य केली जात आहेत.

शिशिर शिंदे यांच्याकडून केले जाणारे आरोप हे शिंदे गटातील अंर्तगत बाब आहे. मात्र, विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदरांची निवड होणार आहे. तसेच काही पदविधर मतदारसंघासाठी देखील निवडणूक होणार आहे. त्यामुळेच प्रसिद्धीसाठी शिशिर शिंदे यांच्याकडून आरोप केले जात असल्याचा दावा देखील अमोल किर्तीकर यांनी केला आहे.

(Edited By Roshan More)

Amol Kirtikar Uddhav Thackeray
Lok Sabha Election 2024 : इंडिया आघाडीला कॅन्सरपेक्षा भयानक आजार! मोदींनी सांगितली तीन आजारांची नावं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com