Amol Mitkari: 'जयंतरावांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला..'; मिटकरींनी मारले एकाच दगडात दोन पक्षी!

Amol Mitkari attacked on Jayantrao Patil: पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या रोहित पाटील यांच्यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने मोठी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या खांद्यावरही पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.
Amol Mitkar
Amol MitkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूवी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पक्षाअंतर्गत विविध नियुक्त्या केल्या आहेत. इस्लामपूरचे आमदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच रविवारी रात्री यासंदर्भातील अधिकृत घोषणा आपल्या एक्सवरुन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी यावरुन जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

मिटकरींनी रोहित पाटील यांच्या निवडीवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचीही खिल्ली उडवली आहे. मिटकरी यांनी एक्स्वर पोस्ट शेअर करीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या निवडीचा समाचार घेतला आहे. निवड झालेल्या नेत्यांचे खोचकपणे मिटकरी यांनी अभिनंदन केले आहे.

Amol Mitkar
EVM Controversy : जगभरात EVM वर कोणत्या देशात आहे बंदी; जाणून घ्या!

"तुतारी गटाच्या मुख्य प्रतोदपदी नवखे तरुण आमदार रोहित आर आर आबांवर जबाबदारी देऊन जयंत पाटील साहेबांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. शिवाय या नावाच्या वैश्विक ज्ञान पाजळणाऱ्या बालिश योग्य जागाही दाखवली आहे," अशा शब्दात मिटकरींनी दोन्ही रोहित यांना डिवचलं आहे. मिटकरींनी एकाच दगडात दोन पक्षी मारले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर.पाटील यांचे पुत्र आणि पहिल्यांदाच विधानसभेत आमदार म्हणून निवडून आलेल्या रोहित पाटील यांच्यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने मोठी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या खांद्यावरही पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी डॉ. जितेंद्र आव्हाड, मुख्य प्रतोदपदी रोहित आर. आर पाटील आणि प्रतोदपदी उत्तम जानकर यांची निवड करण्यात आली," अशी घोषणा जयंत पाटील यांनी केली आहे.

Amol Mitkar
Devendra Fadnavis: फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन; काय झाली चर्चा Video पाहा

कमी वयात मोठी जबाबदारी आमदार रोहित पाटील यांच्यावर पक्षाने सोपवली आहे. आमदार उत्तम जानकर यांना देखील प्रतोदपदी कार्यभार देण्यात आला आहे.काल (रविवारी) पक्षाची बैठक झाली. यावेळी 9 सदस्य उपस्थित होते, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर बैठकीला उपस्थित नव्हते. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागा जिंकल्या आहेत. त्यात, तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील तर माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर विधानसभेत पोहोचले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com