Chhagan Bhujbal : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांना पुन्हा डिवचले...

Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ प्रकरणावर दिले मोठे संकेत. छगन भुजबळ यांच्याकडून मंत्रिपदासाठी सुरू असलेल्या दबावाच्या राजकारणावर टीका केली आहे.
Chhagan Bhujbal, manikrao Kokate
Chhagan Bhujbal, manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: नाशिक मधून छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माणिकराव कोकाटे यांना मंत्री केले. यावर कृषिमंत्री कोकाटे आणि छगन भुजबळ यांच्यातील राजकीय टोलेबाजी अद्यापही सुरूच आहे. कृषिमंत्री कोकाटे यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून मंत्रिपदासाठी सुरू असलेल्या दबावाच्या राजकारणावर टीका केली आहे.

ते म्हणाले, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या दृष्टीने त्यांचे कुटुंब हेच एकमेव ओबीसी आहेत. विशेष म्हणजे स्वतः भुजबळ आणि त्यांचा पुतण्या हेच केवळ ओबीसी आहेत, अशा अविर्भावात त्यांची वर्तणूक सुरू आहे. अन्य कोणी ओबीसी त्यांना दिसतच नाही. या शब्दात मंत्री कोकाटे यांनी भुजबळ यांचा पुन्हा एकदा समाचार घेतला आहे.

Chhagan Bhujbal, manikrao Kokate
Nilesh Lanke : '...तर राजीनामा देईल'; खासदार नीलेश लंके भर बैठकीत असं का म्हणाले?

यावेळी कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने आजवर छगन भुजबळ यांना न्याय दिला आहे. त्यांना जी संधी दिली आहे, तशी आजवर कोणालाही दिलेली नाही. त्यामुळे भुजबळ यांनी योग्य बोध घेतला तर ते चांगले होईल.

ग्रामीण भागात गावागावांत मराठा आणि ओबीसींसह (OBC) सर्व समाज एकत्र वावरतात. त्यांच्यातील संबंध अतिशय चांगले आहेत. ते सगळे एकत्रितपणे काम करतात. त्यांचा एकमेकांवर विश्वास आहे. या मध्ये तेढ निर्माण करणे आणि समाजा समाजात फूट पाडणे हे राजकारण मला पटणारे नाही.

Chhagan Bhujbal, manikrao Kokate
Hasan Mushrif : इचलकरंजीत महाविकास आघाडीला धक्का,' ही' आघाडी बाहेर पडून जाणार महायुतीत

राज्य सरकार मध्ये सध्या ४२ मंत्री आहेत यातील १७ मंत्री ओबीसी घटकांतून येतात. १६ मंत्री मराठा समाजाचे आहेत. अशा स्थितीत ओबीसी समाजाला सर्वाधिक न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यांनी घेतलेली भूमिका स्वागत करावे अशी आहे. असे असतानाही भुजबळ मात्र ओबीसींवर अन्याय झाला असे सांगतात हे ढोंग मला अजिबात मान्य नाही भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने पक्षाकडून कोणतीही चूक झालेली नाही. त्यांना मंत्रिपद मिळावे यासाठी आपण मध्यस्थी किंवा चर्चा करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com