Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात आरोपपत्र दाखल

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात 20 फेब्रुवारी रोजी फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगची तक्रार दिली होती
Amruta Fadnavis Blackmail Case
Amruta Fadnavis Blackmail Case Sarkarnama

Mumbai : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व गायिका अमृता फडणवीस यांनी २० फेब्रुवारी रोजी फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी एसआयटीने ब्लॅकमेल करून लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध ७३३ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यात अनिल जयसिंघानी, त्यांची मुलगी अनिक्षा आणि चुलत भाऊ निर्मल यांची नावे आरोपी म्हणून ठेवण्यात आली आहेत. मात्र, आता या प्रकरणी नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात 20 फेब्रुवारी रोजी फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगची तक्रार दिली होती. त्यानुसार, बुकी अनिल जयसिंघानी, मुलगी अनिक्षा आणि त्याचा चुलत भाऊ निर्मल यांना लाच आणि ब्लॅकमेलच्या आरोपाखाली अटक केली होती. अनिल जयसिंघानी यांच्यावर अमृता फडणवीस यांना काही ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप सार्वजनिक करण्याची धमकी दिल्याचा आणि खंडणीचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

Amruta Fadnavis Blackmail Case
Breaking ! शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार: शिक्षण आयुक्तांचे एसीबी'ला पत्र

फडणवीस यांनी बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षासोबत केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचा समावेश असलेल्या ७३३ पानांचे आरोपपत्र १८ मे रोजी मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. यात अमृता फडणवीस(Amruta Fadanvis) यांना या गुन्ह्यात मदत करण्याच्या बदल्यात १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.

मुंबई पोलिसांनी केले ७३३ पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. कुप्रसिध्द बुकी अनिल जयसिंघानीला १००० कोटी रुपयांचे नुकसान सोसावं लागलं. त्याच्याविरुध्द दाखल १७ गुन्ह्यामुळे तो सतत पळत असल्यानं नुकसान झाला असल्याचा दावा त्यानं अमृता फडणवीस यांच्याशी बोलताना केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

या गुन्ह्यात मदत करण्याच्या बदल्यात १ कोटी रुपयांची ऑफर अमृता फडणवीस यांना देण्यात आली होती. त्यांची ऑफर धुडकावल्यानंतर १० कोटींची खंडणी मागितल्याचंही आरोपपत्रात म्हटलं आहे. अन्यथा त्याच्यातील व्हिडिओ आणि ऑडियो रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे.

Amruta Fadnavis Blackmail Case
Shashikant Shinde target Shinde-Fadanvis: तुम्ही माझं घर फोडलं, मी तुमची...; शशिकांत शिंदेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा

जयसिंघानी ईडीच्या रडारवर...

अनिल जयसिंघानी(Anil Jaysinghani) याची मुलगी अनिक्षा हिला काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तिची जामिनावर सुटका झाली असली, तरी तिचे वडील अनिल जयसिंघानी हे अजूनही गुजरात पोलिसांच्या ताब्यात आहेत. यानंतर ईडीकडूनही या लाच प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर आज ईडीचं पथक अनिल जयसिंघानी याच्या घरी तपासासाठी दाखल झालं आहे. पथकातील 8 ते 10 अधिकारी जयसिंघानी याच्या घरी तपास करत आहेत.

Amruta Fadnavis Blackmail Case
Breaking ! शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार: शिक्षण आयुक्तांची ३६ अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

फडणवीस यांना एक कोटीची ऑफर....

अनिक्षा जयसिंघानी हिची 2015-16 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर 2021 मध्ये डिझायनर बनून अनिक्षाने अमृता यांच्याशी जवळीक साधली. यानंतर आपले वडील अनिल जयसिंघानी यांच्या विरोधात दाखल गुन्ह्य करण्यासाठी मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपये अमृता यांना देऊ केले होते असा आरोप करण्यात आला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com