Anil Deshmukh News: 'ईडी सरकारचे 'वर्ल्ड रिकॉर्ड'; देशमुखांवर तब्बल १०९ वेळा रेड'

Anil Deshmukh News : तब्बल १३ महिन्यानंतर अनिल देशमुख हे तुरुंगातून बाहेर
 Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Anil Deshmukh News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल १३ महिन्यानंतर अनिल देशमुख हे तुरुंगातून बाहेर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

अनिल देशमुख हे जेलबाहेर येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, ''देशमुख कुटुंबावर तब्बल १०९ वेळा रेड टाकून ईडी सरकारने वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे'', असं म्हणत त्यांनी सरकारला टोला लगावला आहे.

अनिल देशमुख हे तब्बल १३ महिन्यानंतर जेलबाहेर येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित राहणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या ''अनिल देशमुख यांच्यावर या ईडी सरकारकडून खोटे आरोप करण्यात आले. कोर्टाच्या आर्डरमध्ये कुठलाही पुरावा त्यांच्याविरोधात सापडलेला नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने तर वर्ल्ड रिकॉर्ड केलंय. अनिल देशमुख आणि त्यांच्या कुंटुबांवर तब्बल १०९ वेळा रेड टाकण्यात आली. एवढ्या वेळा रेड करावी लागली याचा अर्थ त्यांना काहीही सापडले नाही. याबाबतची नोंद देखील कोर्टाच्या आर्डरमध्ये आहे'', असं त्या म्हणाल्या.

 Anil Deshmukh
Maratha Reservation : 'त्या'वेळी मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षण का नाकारलं? पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं उत्तर

''अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही. कोणीतरी काहीतरी बोललं त्यावरून हे आरोप केले गेले. आरोप करणारे एक ग्रस्त जेलमध्ये आहेत तर दुसरे कुठे आहेत याबाबत कुणालाच कल्पना नाही. महाराष्ट्रामध्ये सुडाचे राजकारण या आधी कधीही झाले नाही''.

''मात्र आता सुडाच्या राजकारणाची शक्यता नाकारता येत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे. आम्ही याबाबत सातत्याने सांगत होतो की देशमुखांवर करण्यात आलेल्या आरोपामध्ये तथ्य नाही. ते निर्दोष आहेत आणि हेच त्या कोर्टाच्या आर्डरमध्ये देखील म्हटलं आहे. त्यामुळे सत्य बाहेर आलं आहे'', असं त्या यावेळी म्हणाल्या.

 Anil Deshmukh
Winter Session News: पंतप्रधान मोदींवर टिप्पणी! अभिजीत वंजारी अन् प्रसाद लाड भिडले

अनिल देशमुखांवर नेमकं काय आरोप होते?

मुंबईचे (Mumbai) माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर तब्बल 100 कोटी वसूलीचा आरोप केला होता. या आरोपानंतर ईडीने त्यांना २ नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक केली होती. याप्रकरणात उच्च न्यायालयानेही सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर या दोन्ही यंत्रणांनी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. त्यानंतर आता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याने ते तब्बल १३ महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com