Chandrahar Patil : चंद्रहार पाटील आणखी एक डाव टाकणार? उद्धव ठाकरेंच्या भेटीचं गुपीत काय?

Vidhan Bhavan Politics : उद्धव ठाकरे आणि चंद्रहार पाटील हे जवळपास पाच ते सहा तास एकत्र होते.
Chandrahar Patil
Chandrahar PatilSarkarnama

Sangli Political News : सांगली लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात ठाकरे गटाचे उमदेवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी पराभव केला. या पराभवानंतर चंद्रहार पाटलांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली.

उद्धव ठाकरे आणि चंद्रहार पाटील हे जवळपास पाच ते सहा तास एकत्र होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चंद्रहार पाटील आणखी एक राजकीय डाव टाकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील वेगळ्याच राजकीय भूमिकेत असल्याचे दिसते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आज विधिमंडळाच्या कामकाजासाठी आले होते. त्यावेळेस चंद्रहार पाटील यांनी देखील विधिमंडळ इमारतीत हजेरी लावली. त्यामुळे चंद्रहार पाटील आगामी राजकीय इंनिंगच्या तयारी करत असल्याच्या चर्चांना जोर धरला आहे.

भारतीय जनता पक्षाची ताकत असलेले संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात आव्हान असतानाही चंद्रहार पाटील Chandrahar Patil सांगलीच्या आखाड्यात शड्डू ठोकला होता. यानंतर चंद्रहार पाटील आज पुन्हा एकदा आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवा डाव टाकण्याची शक्यता दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून की काय ते विधानभवनामध्ये आले होते.

त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी आमदारांना आमदारांच्या गाठीभेटी घेतल्या. मात्र याच काळामध्ये विशेषतः अधिवेशनाच्या काळामध्ये चंद्रहार पाटील विधानभवनात का आले? डोक्यात विधानसभेचे, तर गणित नाही ना, यासारखे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Chandrahar Patil
Ambadas Danve : निलंबनानंतर अंबादास दानवे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, पाशवी बहुमताच्या...

दरम्यान चंद्रहार पाटील आले त्याच वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात होते. त्यामुळे चंद्रहार पाटील पुढच्या राजकीय इनिंगसाठी ठाकरेंच्या भेटीला आले का? याचीही उत्सुकता आहे. मात्र पुढील काही दिवसांमध्ये चंद्रहार पाटील नेमका कुठे आणि कसा राजकीय डाव टाकतात, याची उत्सुकता आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रहार पाटील महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी उभे होते. महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांनी उमेदवारी केली होती. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली. विशाल पाटील Vishal Patil या निवडणुकीत जिंकले. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचे विशाल पाटील यांना बळ मिळाले. यामुळे विशाल पाटील यांना निवडणूक सोपी झाली.

आता अपक्ष म्हणून निवडून आलेले खासदार विशाल पाटील काँग्रेसच्या संपर्कात आहेत. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले डबल केसरी चंद्रहार पाटील हे राजकीय पुनर्वसनासाठी धडपडत आहेत. यातूनच चंद्रहार पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळ इमारतीत हजेरी लावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Chandrahar Patil
Uddhav Thackeray On Ambadas Danve : अंबादास दानवेंच्या निलंबनाचं 'षडयंत्र' उद्धव ठाकरेंनी सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com