Ambadas Danve : निलंबनानंतर अंबादास दानवे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, पाशवी बहुमताच्या...

Vidhan Parishad News : सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी होती. मात्र कोणाचीही वैयक्तिकरित्या दिलगिरी मागण्याचा प्रश्नच येत नव्हता.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचं मंगळवारी (2 जुलै) रोजी निलंबन करण्यात आलं. पाशवी बहुमताच्या जोरावर सरकारने माझं निलंबन केल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी दिली.

विधान परिषदेचे कामकाज सुरू असताना सोमवारी राहुल गांधी यांच्या हिंदुत्वाबद्दलच्या वक्तव्यावरून परिषदेत जोरदार राडा झाला.

या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Ambadas Danve यांनी भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना शिवीगाळ केली. यानंतर सत्ताधारी आमदार आक्रमक झाले आणि त्यांनी दानवे यांच्या राजीनामेची मागणी लावून धरली.

यासाठी सकाळपासूनच सत्ताधारी आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं होतं . आणि आता अखेर दानवे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. या सर्व प्रकरणावर दानवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

दानवे म्हणाले, "सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी होती. मात्र कोणाचीही वैयक्तिकरित्या दिलगिरी मागण्याचा प्रश्नच येत नव्हता. परंतु पाशवी बहुमताच्या जोरावर माझं निलंबन झालं आहे. याच्यावर निश्चित जनतेच्या दरबारात आवाज उठवेन."

Ambadas Danve
Uddhav Thackeray On Ambadas Danve : अंबादास दानवेंच्या निलंबनाचं 'षडयंत्र' उद्धव ठाकरेंनी सांगितलं

"जे सर्व एका बाजूने कारवाई झालेली आहे. निश्चितच याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. कारण लोकसभेच्या निवडणुकीआधीही त्यांनी अशाच प्रकारे दीडशे खासदारांचा निलंबन केलं होतं. त्याचप्रमाणे एका संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीचं त्यांनी निलंबन केलं आहे", असा इशाराही दानवेंनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

षडयंत्र रचून निलंबन

निलंबनाच्या प्रस्तावावर चर्चा होणं गरजेचं असतं. मात्र दानवे यांचं एकतर्फी निलंबन करण्यात आल्याकडे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी लक्ष वेधले. विरोधी पक्षनेतेला अशाप्रकारे निलंबित करण्याचा हा इतिहासातील पहिलीच घटना असल्याचंही ठाकरे यावेळी म्हणाले. शिवाय शिक्षक, पदवीधर मतदारसंघातील आमच्या विजयाची चर्चा होऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी षडयंत्र रचून दानवेंचे निलंबन केल्याचेही ठाकरेंनी आरोप केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ambadas Danve
Uddhav Thackeray : दानवेंची शिवीगाळ अन् उद्धव ठाकरेंनी मागितली माफी; भाजपनं महिलांचा केलेल्या अपमानाची जंत्रीच मांडली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com