Thane News : ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. या वेळी त्यांनी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. फडणवीस म्हणाले, "गुढीपाडवा सर्वांना शुभेच्छा. अनेक लोकांनी पक्षाच्या या कार्यालयासाठी प्रचंड मेहनत घेतली. अतिशय वेगाने बांधकाम केले. रेमंड यांचे आभार. पक्षाने कुणाकडून देणगी घेतली नाही. आपल्यात आणि इतर पक्षात हाच फरक आहे. बाकीचे नेते आपली प्रॉपर्टी कशी वाढेल याकडे लक्ष देतात. आपले नेते भाजप कशी वाढेल, हा विचार करतात," असे फडणवीस म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आपली गुंतवणूक जनताच आहे. जनतेचं प्रेम हीच आपली गुंतवणूक आहे. जनतेचं आशीर्वाद मिळवण्यासाठी जी काही आपल्याला गुंतवणूक करता येईव, ती आपल्याला केली पाहिजे. लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत, यासाठी आपल्याला काम करायचे आहे. यासाठी ही वास्तू कामाला येईल. खरं म्हणजे अतिशय सुंदर असं कार्यालय उभं झालं आहे. भाजप आता आधुनिक पावलं टाकत आहे, असेही फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
ठाण्यात भाजपचं (BJP) काम सुंदर आहे. आपले मित्रपक्षदेखील आपल्यासोबत राहिले. त्यांचं सहकार्य लाभलं. पण भाजपनेही मजबुतीने या शहरात काम केले आहे. आज या शहरात भाजप एक प्रमुख पक्ष म्हणून समोर आला आहे. आपलेच कार्यकर्ते इथे पाहायला मिळतात. आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुकींच्या आपल्या चांगले यश मिळाले, असे फडणवीस म्हणाले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.