Damania Vs Bhujbal : अंजली दमानियांना पोलिसांनी रोखलं; भुजबळांची सुरक्षा वाढवली...

Anjali Damania Vs Chhagan Bhujbal : दमानिया यांना आता सांताक्रूज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Anjali Damania Vs Chhagan Bhujbal :
Anjali Damania Vs Chhagan Bhujbal :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : सामाजिक कार्यकर्त्या व भ्रष्टाचारविरोधी लढ्यातील नेत्या अंजली दमानिया या राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. दमानिया या भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकार परिषद घेणार असे जाहीर केले होते. यासाठी त्या भुजबळ यांच्या घराच्या दिशेने रवानाही झाल्या होत्या, मात्र त्यांना रस्त्यातच पोलिसांनी रोखलं आहे. दमानिया यांना आता सांताक्रूज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर त्यांना जुहू पोलिस ठाण्यात आणलं गेलं आहे. या सर्व कारवाईच्या वेळी दमानिया आणि पोलिस कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची झाली. (Latest Marathi News)

Anjali Damania Vs Chhagan Bhujbal :
Ajit Pawar NCP : महायुतीत लोकसभेचा तिढा; नऊ जागांसाठी अजित पवार गट आग्रही, 'या' नावांची चर्चा

दमानियांचा इशारा -

छगन भुजबळ यांनी जे काल भाषण केले आहे, त्यामुळे थेट त्यांच्या घरासमोरच जाऊन मी पत्रकार परिषद घेऊन दाखवणार आहे. मात्र, दमानियांनी दिलेल्या या आव्हानानंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवून, बंदोबस्त वाढवला आहे. बॅरिकेड्स लावलेल्या दिसत आहेत. मात्र, तरीही मी पत्रकार परिषद घेणारच, पोलिसांनी जिथे अडवलं तिथे परिषद घेईन, असा इशारा दमानिया यांनी दिला होता.

छगन भुजबळांच्या घरी सुरक्षा वाढवली -

नाशिक येथील मंत्री छगन भुजबळांच्या घरी या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा आणि बंदोबस्त वाढवला आहे. ओबीसी सभेनंतर मंत्री भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com