नवाब मलिकांच्या अनुपस्थितीत राणे-जाधवांवर मुंबई राष्ट्रवादीची धुरा

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी राखी जाधव, नरेंद्र राणे यांची नियुक्ती
Rakhi Jadhav-Narendra Rane
Rakhi Jadhav-Narendra Rane Sarkarnama

मुंबई : कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik ) यांच्याकडील मुंबई अध्यक्षपद कायम ठेवत त्यांच्या जोडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय, नगरसेविका राखी जाधव आणि नरेंद्र राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांच्या गैरहजेरीत मुंबईची धुरा जाधव-राणे यांच्या खांद्यावर असणार आहे. (Appointment of Rakhi Jadhav & Narendra Rane as Working President of Mumbai NCP)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (ता. १९ मार्च) जाधव आणि राणे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या अनुपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पक्ष संघटनेची जबाबदारी संयुक्तपणे या कार्याध्यक्षांवर असेल. जाधव आणि राणे हे पक्षाची संघटना यापुढील काळात अधिक बळकट करतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.

Rakhi Jadhav-Narendra Rane
भाजपकडून सत्यजित कदमांना उमेदवारी जाहीर; काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष!

राखी जाधव या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका असून त्या तीन वेळा घाटकोपरमधून महापलिकेची निवडणूक जिंकून आलेल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. मुंबई महापलिकेतील गटनेतेपदही राखी जाधव यांच्याकडेच आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने आता त्यांच्याकडे कार्याध्यक्षासाखी मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Rakhi Jadhav-Narendra Rane
कोल्हापूरच्या राजकारणात ट्विस्ट : शिवसेनेचे राजेश क्षीरसागर ‘नॉट रिचेबल’!

नरेंद्र राणे यांच्याकडे यापूर्वी मुंबईच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यांना आता कार्याध्यक्षपदी बढती मिळाली आहे. सिद्धीविनायक मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणूनही राणे यांनी काम पाहिले आहे. त्यांच्यावरही पक्षाने विश्वास टाकत कार्याध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. मुंबई महापलिकेत सध्या राष्ट्रवादीचे केवळ आठ नगरसेवक आहेत. पक्षाने ५० ते ६० नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. त्या दृष्टीने राणे आणि जाधव यांना काम करावे लागणार आहे. त्यातच नवाब मलिक हे स्टार प्रचारक सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याने पक्षसंघटना बांधणीचे मोठे आव्हान या दोघांपुढे असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com