Chitra Wagh News : मराठीच्या मुद्यावर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले आहेत. हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी एकजुट दाखवली. मुंबईत मराठीचा आग्रह देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेकडून धरला जात आहे. मात्र, हिंदीतून बोलला म्हणून लोकलमध्ये मारहाण झालेल्या अर्णव खैरे या काॅलेज तरुणाने घरी येऊन आत्महत्या केली.
अर्णव खैरेच्या मृत्यूनंतर मराठीवरून राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंवर भाजप आमदार चित्रा वाघ, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम हे तुटून पडले आहेत. साटम म्हणाले, जावेद अख्तर राज ठाकरेंच्या दीपोत्सवामध्ये हिंदीतून भाषण केलेले आपल्याला चालतात परंतु एका मराठी तरुणाने एक वाक्य हिंदीत बोलला तर त्याला आपला जीव गमवावा लागतो.आपल्या या दुटप्पी आणि ढोंगीपणाच्या राजकारणाचा निषेध आहे. मराठी माणूस आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील त्यांनी राज ठाकरेंना दिला.
चित्रा वाघ म्हणाल्या, 'आपल्या मुलांच्या राजकीय भविष्यासाठी, त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी भाषावादाचे विष लोकांचे मनात विष कालवले. आणि त्याची पहिली मोठी किंमत मराठी कुंटुंबालाच भोगावी लागली. कल्याणमधील अर्णव खैरेने आपले जीवन संपवले.
'अर्णवचा गुन्हा काय होता? मराठी भाषा अभिमानी राजकीय मुलं परदेशात शिकतात, इंग्रजी माध्यमात शिकतात ते तुम्हाला चालतं? या नेत्यांची मुलं बाॅलिवूड पार्ट्यांमध्ये जातात तेव्हा मराठी बोलतात का? याचा विचार अर्णवला मारहाण करणाऱ्यांनी केलाय का? झालेला प्रकार हा फक्त हिंसेचा नाही तर जाणूनबुजून पेरल्या जाणाऱ्या भाषावादाच्या राजकारणाचा परिणाम आहे.' , असे म्हणत चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधूंचे नाव न घेता टीका केली.
राजकीय नेते मराठी-हिंदीच्या नावार भुलवतायेत आणि त्यामुळे निरअपराध अर्णव सारखा तरुण आपलं जीवन संपवतोय. भाषा संवादाचं माध्यम असताना काही नेते तिला विवादाचं शस्त्र बनवत आहेत. अर्णव मराठी असून हिंदी बोलला हा काय त्याचा गुन्हा होता का? भाषाभिमान ठेवा पण आपल्या इतर भारतीय भाषांचा द्वेष करण्यात काय अर्थ आहे. या भाषाद्वेषाच्या नावाने महाराष्ट्रात विष कालवणाऱ्या सत्तापिपासूंचा हेतू ओळखा, असे आवाहन देखील चित्रा वाघ यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.