Arvind Kejariwal News : दिल्लीतच नाही,तर केजरीवालांची मुंबईतही मोदींना ‘टशन’; ठाकरे, पवारांचा उल्लेख थेट असली...

Mahavikas Aaghadi Mumbai Sabha : महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (ता.17) बीकेसी मैदानावर झालेल्या सभेत अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर तुफानी हल्लाबोल केला.
Narendra Modi, Arvind kejriwal
Narendra Modi, Arvind kejriwalSarkarnama

Arvind Kejariwal News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात आत्तापर्यंत जवळपास 20 सभा घेतल्या आहेत. या सभांमधून त्यांनी उद्धव ठाकरे यांची नकली शिवसेना आणि शरद पवारांची नकली राष्ट्रवादी काँग्रेस असा उल्लेख करत डिवचलं होतं.पण आता ही टीका ठाकरेंना चांगलीच झोंबली होती.

मात्र, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी थेट मुंबईत येऊन महाविकास आघाडीच्या सभेत थेट पंतप्रधान मोदींना टशन दिली आहे.त्यांनी उद्धव ठाकरेंचा 'असली शिवसेना'प्रमुख आणि 'असली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष' म्हणून शरद पवारांचा उल्लेख केला.

Narendra Modi, Arvind kejriwal
Narendra Modi News : 'शिवतीर्थ'वरील सभेआधीच मोदींचा 'मास्टर स्ट्रोक'; विरोधकांच्या प्रचाराचा 'तो' मुद्दाच गुंडाळला?

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (ता.17) बीकेसी मैदानावर झालेल्या सभेत अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर तुफानी हल्लाबोल केला. ते म्हणाले, नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देशाला हुकुमशाहीकडे घेऊन चालले आहेत.हळूहळू ते बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेले शानदार लोकशाही संपवू पाहत आहेत.म्हणून मी आज तुमच्याकडे भीक मागण्यासाठी आलो आहे.देशाला हुकुमशाही आणि गुलामगिरीपासून वाचवा असे आवाहन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी त्याचं उदाहरण आहे. कारण 2015 ला दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीला 70 पैकी 67 जागा तर भाजपला अवघ्या ३ जागा मिळाल्या होत्या.तर पाच वर्षांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपला पुन्हा 70 पैकी 62 तर भाजपला 8 जागा जिंकता आल्या.तेव्हा मोदींनी हे दिल्लीत आम आदमी पार्टीला (AAP) आपण हरवू शकत नाही.

मग त्यांनी माझ्याविरोधात खोटी केस बनवली दिली.त्यात मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि मला अटक केली.त्यांना वाटलं हरवलं जात नाही तर अटक करा.त्यांना वाटलं अटक केल्यानंतर केजरीवाल राजीनामा देतील. पण आम्ही तुरुंगातून सरकार चालवण्याचं ठरवलं.मी राजीनामा नाही दिला. जर मोदी लोकशाहीला तुरुंगात कैद करत असतील तर आम्ही लोकशाही तुरुंगातून वाचवू असा इशाराही दिला.

Narendra Modi, Arvind kejriwal
Uddhav Thackeray News : 'उद्धव ठाकरेंना संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला महाराष्ट्र्र गाडल्याशिवाय राहणार नाही'

मी खूप छोटा माणूस आहे आणि माझा पक्षही खूप छोटा आहे.आम्ही आता फक्त पंजाब आणि दिल्ली अशा दोनच राज्यात सत्तेत आहोत. तरीदेखील आपल्याला मोदी सरकारने अटक का केली याचा विचार करत होतो. त्यावेळी लक्षात आलं की,दिल्लीतील गरीब विद्यार्थ्यांसाठी मी चांगल्या शाळा, महाविद्यालये निर्माण केली.मोदींना हे नको आहेत असंही केजरीवाल म्हणाले.

Narendra Modi, Arvind kejriwal
Devendra Fadnavis: फडणवीसांनी शिवाजी पार्कवरुन ठाकरेंचा सगळा हिशेबच चुकता केला; 'अर्धवटराव' म्हणत टोमण्यावर टोमणे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com