Aseem Sarode
Aseem SarodeSarkarnama

Uddhav Thackeray Maha Press Conference : 'नार्वेकरांकडून लोकशाहीची हत्या, सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात'

Aseem Sarode : असीम सरोदे : भरत गोगावलेंना न्यायालयाने मोठा दंड ठोठावला पाहिजे
Published on

Uddhav Thackeray Press Conference on Rahul Narvekar Verdict : शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने पाच महिने सुनावणी घेतली. यावर पाच न्यायाधिशांनी १० व्या परिशिष्ठानुसार कोणता पक्ष खरा यावर चर्चा केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मात्र हे प्रकरण पक्षांतर बंदीचे नसल्याचे सांगून निकाल दिला. ही लोकशाहीची हत्या आहे. नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला, असा घणाघात कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी केला.

राज्यातील सत्तासंघर्षाच्या नार्वेकरांनी दिलेल्या निकालाची उद्धव ठाकरेंनी महापत्रकार परिषद घेऊन चिरफाड करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना सरोदे यांनी पक्षांतर बंदी कायद्याचा उहापोह केला. यावेळी त्यांनी राहुल नार्वेकरांनी गंभीर आरोप करत त्यांनी दिलेला निकाल चुकीचा असल्याचे म्हटले आहे. निकाल देताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या चौकटीकडे दुर्लक्ष केल्याचेही म्हटले आहे.

Aseem Sarode
Pune Police : पाय घसरून पडले, चर्चा मात्र आत्महत्येची; पुण्यात पोलिस अधिकाऱ्यांसोबत नेमकं काय घडलं ?

असीम सरोदेंनी निकाल देण्यासाठी मोठा कट रचल्याचा आरोप केला. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालायने (Supreme Court) शिवसेनेच्या सत्तासंघर्षाचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवताना चौकट ठरवून दिली होती. तसेच वाजवी काळात निकाल देण्याचेही सूचिक केले होते. वास्तविक मात्र अध्यक्षांनी दीड महिन्यानंतर निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पक्षाच्या घटनेची मागणी केली. या काळात कुणी काय मागायचे आणि कुणी काय द्यायचे, याची कट रचल्याची शंका येण्यास वाव आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नार्वेकरांनी निकाल देताना विधीमंडळ पक्ष, नेतृत्वाला महत्व दिले. यावर सरोदे म्हणाले, केवळ बहुमत महत्वाचे नाहीत. त्याला कायदेशीर पुरावा काय आहे, याला महत्व असते. दबावातून पक्ष फोडला आहे. त्यालाच ते बहुमत म्हणतात. अशा पद्धतीने निर्णय देणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा घोर अपमान आहे. गावागावातील लहान मुले सांगत होती, हा निकाल (Uddhav Thackeray) ठाकरेंच्या विरोधातच जाणार. हे लोकशाहीसाठी घातक आहे. त्याविरोधात सर्वांनी प्रश्न उपस्थित केले पाहिजे, असा आवाहनही सरोदेंनी केले.

'राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) अन्यायाचे नाव न्याय ठेवले आहे. आता कायद्याचे राज्य राहिले नाही. मात्र 'काय द्यायचे' याचे राज्य आलेले आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 'निकालानंतर भरत गोगावलेंनी ठाकरे गटाविरोधात केस दाखल केली की या १४ आमदारांना अपात्र का केले नाही. या लोकांवर न्यायालयाने मोठा दंड ठोठावला पाहिजे,' असे अपेक्षा केली. 'ही केस म्हणजे केवळ उद्धव ठाकरे, किंवा शिवसेनेचा प्रश्न नाही. हा प्रश्न लोकशाहीचा आहे. संविधानाचा आहे. मी कुणाच्याही बाजूने बोलत नाही, मी कायद्याच्या बाजूने बोलत आहे,' असेही सरोदेंनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Aseem Sarode
PCMC News : लाचखोरी, फसवणूक अन् आता खुनाच्या गुन्ह्यातही कर्मचारी; पिंपरी महापालिकेत चाललंय तरी काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com