Uddhav Thackeray : 'मातोश्री'बाहेर घातपाताची शक्यता; बंदोबस्तात वाढ, पोलिसांकडे नेमकी माहिती काय ?

Matoshri : मुंबई-गुजरात ट्रेनच्या प्रवासात काही तरुणांच्या चर्चेतील माहिती पोलिसांना मिळाली...
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर घातपाताची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे मातोश्री परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. मातोश्रीबाहेर काहीतरी घातपात करण्यात येणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानंतर तेथील पोलिस सुरक्षेत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यासह देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. यातूनच उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर काहीतरी विघातक होणार असल्याचा फोन आला. या फोनमुळे एकच खळबळ उडाली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन मातोश्रीच्या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Uddhav Thackeray
Gondia Shoot Out : माजी नगरसेवक यादव यांना मारण्यासाठी 40 लाखांची सुपारी

राज्य सरकारचा हात ?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घराबाहेर कांड होणार असल्याची माहिती समजल्यावर सुरक्षा वाढवली आहे. राज्य सरकारला या सगळ्याची कल्पना होती. याआधीही त्यांनी ठाकरे कुटुंबीयांची सुरक्षा कपात केली होती. आता केवळ काही पोलिस उभे केले आहेत. याने सुरक्षा कशी केली जाऊ शकते, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. मात्र या सगळ्यात राज्य सरकारचा हात असावा आणि हे जाणूनबुजून केले जात आहे, असा गंभीर आरोप खासदार अरविंद सावंतांनी केला आहे.

Uddhav Thackeray
Ramdas Athawale : कल्याण-डोंबिवलीमध्ये आठवलेंचे कार्यकर्ते कुठे गेले? महायुतीतील नेत्यांना पडला प्रश्न

ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. उद्धव ठाकरेंची झेड प्लस सुरक्षा काढून झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली. आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) वाय प्लस सुरक्षा काढून त्यांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यातून एक एस्कॉर्ट व्हॅनही कमी करण्यात आली होती. त्यामुळे आता मातोश्रीबाहेर या फोन कॉलच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नेमकी माहिती काय ?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठा घातपात करणार आहेत, असा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला होता. ठाकरेंच्या घराबाहेर घातपात घडवण्याबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीने मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवासात घडलेला कथित घटनाक्रम सांगितला.

मुंबई-गुजरात ट्रेनमध्ये चार ते पाच मुस्लिम व्यक्तींचे संभाषण ऐकून नियंत्रण कक्षाला माहिती देण्यासाठी या व्यक्तीने फोन केला होता. हे मुस्लिम तरुण उर्दूतून संभाषण करीत असल्याचेही संबंधित व्यक्तीने सांगितले.

हे तरुण मोहम्मद अली रोड येथे रूम भाड्यावर घेणार असल्याचा दावाही त्यांनी केला. या माहितीनंतर मुंबई पोलिस सतर्क झाले असून, सुरक्षा, तसेच गस्त वाढवण्यात आल्याचे समजत आहे.

R...

Uddhav Thackeray
Nagar Political : महायुतीचा मेळावा म्हणजे खुर्चीसाठी रेटारेटी...! कोपरखळ्या मारण्यात नेत्यांनी मानली धन्यता...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com